ऑनलाइन लोकमत
इटली, दि. ३० - नवजात जुळ्यांसह ६५०० शरणार्थींना भूमध्य सागरातून इटलीच्या अधिका-यांना वाचविण्यात यश आले आहे.
लिबियातून स्थलांतरित झालेल्या जवळपास ६५०० शरणार्थीं भूमध्य सागरातून खडतर प्रवास सुरु होता. या शरणार्थींमध्ये फक्त पाच दिवस आधी जन्मलेल्या दोन जुळ्या मुलांचा समावेश होता. या सर्व शरणार्थींना सागरातून किना-यावर सुखरुप आण्यासाठी ३० तासांचा कालावधी लागला.
दरम्यान, या शरणार्थींमधून या लहानग्या जुळ्यांना आणि त्यांच्या आईला इटलीच्या एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मेडिसिन्स सॅन्स फ्रंटियर्सने दिली आहे.
Amongst those rescued by #Dignity1 today is this sick 5 day old & its twin. @MSF is trying to organize a medevac. pic.twitter.com/rYAoQRFn9I— MSF Sea (@MSF_Sea) August 29, 2016