लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जगातील विकसनशील देश कर्जाच्या विळख्यात अडकले असून, यातून बाहेर पडण्याचा त्यांचा मार्ग दिवसेंदिवस कठीण बनत चालला आहे. कर्जाचा बोजा वाढल्याने श्रीलंकेसह जगभरातील तब्बल ६९ देशांवर कंगाल होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
जागतिक बँकेने दिलेल्या माहितीनुसार, लेबनान, ट्यूनिशियासह दोन डझनपेक्षा अधिक देशांत युक्रेन संकट आणि महागाईमुळे वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ, अन्नधान्य टंचाई, बाजारातील घसरणीसह भयंकर बेरोजगारी यामुळे गृहयुद्ध भडकण्याची शक्यता आहे. जगातील अनेक देश विदेशी कर्जाचे हप्ते भरण्यास असमर्थ ठरले आहेत. त्यामुळे हे अनेक पिढ्यांमधील सर्वात मोठे कर्जसंकट ठरले आहे. याचा परिणाम भारतावरही होण्याचा धोका आहे. विकसनशील देश कर्जाच्या जाळ्यात अडकून कंगाल होण्याची भीती असल्याचा इशारा जागतिक बँकेने दिला आहे. ७० देशांना यावर्षी ११ अब्ज डॉलरपेक्षा अधिक विदेशी कर्जाचे हप्ते द्यावे लागणार असून, तिजोरी रिकामी असल्याने हे पैसे कुठून आणायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
या देशांना अधिक धोका...इजिप्त : युक्रेन संकटामुळे अन्नधान्याचा तुटवडा, केवळ ३ महिन्यांचा गहू शिल्लकट्यूनिशिया : विदेशी कर्ज देशाच्या जीडीपीपेक्षा १०० टक्केपेक्षा अधिक. महागाई ७ टक्क्यांपेक्षा अधिक. गृहयुद्धाची भीतीलेबनान : बैरुत स्फोटात देशातील सर्वात मोठा धान्याचा साठा नष्ट. अन्नधान्याच्या किमती ११ टक्क्यांनी वाढल्या. चलनाची किंमत ९० टक्क्यांनी घटली. कर्ज जीडीपीपेक्षा ३६० टक्के अधिकअर्जेंटिना : ९ वेळा विदेशी कर्जाचे हप्ते भरण्यास असमर्थ
n अल-सल्वाडोर, पेरू, इथियोपिया, घाना, केनिया, तुर्की आणि दक्षिण आफ्रिकेवर कर्जामुळे कंगाल होण्याची वेळ आली आहे.n या देशांवर विदेशी कर्ज जीडीपीच्या ७० ते १००% इतके वाढले आहे. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांच्याकडे पैसाच शिल्लक नाही. n त्यामुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदतीची याचना केली आहेत.
...यामुळे श्रीलंका बुडालाn राजपक्षे सरकारचे चुकीचे नियोजनn उत्पन्नापेक्षा खर्च अधिक केलाn करामध्ये मोठी सूट दिली, त्यामुळे अर्थव्यवस्था पुरती ढेपाळली.
...यामुळे जगभरातून मदत मिळेनाn कोरोना महामारीमुळे जगभरातील अर्थव्यवस्थांमध्ये मंदी. कर्ज घेण्याचा खर्च वाढला, व्याज दर वाढल्याने कर्ज घेणे महागले. n रशिया-युक्रेन युद्धामुळे खाद्यपदार्थ, तेल, धातू महागले. युद्धामुळे पुरवठा साखळी उद्ध्वस्त