शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

ब्रिटन भारताला परत करणार ७ कलाकृती, लवकरच हस्तांतरणाच्या कागदावर स्वाक्षऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 7:15 PM

ब्रिटनमधील (Brittan)भारतीय उच्चायुक्त कार्यवाहक सुजित घोष यांच्या उपस्थितीत केल्व्हिनग्रोव्ह आर्ट गॅलरी ॲंड म्युझियम (Kelvin grove art gallery and museum) येथे मालकीहक्क समारंभाच्या हस्तांतरणाच्या वेळी हा निर्णय औपचारिकरित्या जाहीर करण्यात आला होता.

स्कॉटलंडमधील (Scotland) ग्लासगो (Glasgow) या शहरातील संग्रहालयांनी भारत सरकारबरोबर चोरीच्या सात वस्तू परत आणण्यासंदर्भातील करारावर स्वाक्षरी केली आहे. ग्लासगो लाइफ या संग्रहालयाचे संचालन करणाऱ्या सेवाभावी संस्थेने या वर्षाच्या सुरवातीस या कलाकृती परत सोपवण्यास दुजोरा दिला होता. ब्रिटनमधील (Brittan)भारतीय उच्चायुक्त कार्यवाहक सुजित घोष यांच्या उपस्थितीत केल्व्हिनग्रोव्ह आर्ट गॅलरी ॲंड म्युझियम (Kelvin grove art gallery and museum) येथे मालकीहक्क समारंभाच्या हस्तांतरणाच्या वेळी हा निर्णय औपचारिकरित्या जाहीर करण्यात आला होता.

यावेळी बोलताना सुजित घोष यांनी सांगितले की, ‘ ग्लासगो लाइफ सोबत झालेल्या आमच्या भागीदारीमुळे, ग्लासगो संग्रहालयांमधील भारतीय कलाकृती भारतात परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याचा आम्हाला आनंद वाटतो. या कलाकृती आपल्या संस्कृतीच्या वारशाचा अविभाज्य भाग आहेत आणि आता त्या घरी परत येऊ शकतील. हे ज्यांच्यामुळे शक्य झाले, त्या सर्व भागधारकांचे कौतुक करतो, विशेषत: ग्लासगो लाइफ आणि ग्लासगो सिटी काऊन्सिल यांचेही आम्ही कौतुक करू इच्छितो,’ असेही घोष यांनी नमूद केले.

19 व्या शतकादरम्यान उत्तर भारतातील विविध राज्यातील मंदिरांमधून बहुतांश वस्तू हटवण्यात आल्या होत्या. तर एक वस्तू त्याच्या मालकाकडून चोरी झाल्यानंतर खरेदी करण्यात आली होती. ग्लासगो लाइफने दिलेल्या माहितीनुसार, ग्लासगोच्या संग्रहालयात सातही कलाकृती भेट म्हणून देण्यात आल्या होत्या. या संग्रहालयातील संग्रहाचे प्रमुख डंकन डोर्नन यांनी सांगितले, ‘ भारतीय पुरातन वस्तूंच्या मालकीचे हस्तांतरण हे ग्लासगोसाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. भारतीय उच्चायुक्तालय आणि ब्रिटिश उच्चायुक्तालयाने दिलेले सहकार्य आणि पाठिंब्यासाठी त्यांना श्रेय दिले पाहिजे. या कलाकृती सुरक्षितपणे परत करण्यासाठी आम्ही भारतीय अधिकाऱ्यांसोबत आमचे काम सुरू ठेवण्यासाठी तत्पर आहोत’, असेही डोर्नन यांनी नमूद केले.

ब्रिटनमधून 7 कलाकृती भारताला परत मिळत असल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिली होती. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले होते. ’14 व्या शतकातील भारतीय- फारसी तलवार आणि 11 व्या शतकातील कोरीव काम केलेली दगडी दरवाज्याची चौकट यासह 7 कलाकृती भारतात परत आणल्या जातील,’ असे रेड्डी यांनी नमूद केले होते.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटकेIndiaभारत