शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

७ भारतीय कंपन्या पुरवत आहेत 'इसिस'ला रसद

By admin | Published: February 26, 2016 3:54 AM

२० देशांतील कंपन्यांकडून होत असलेल्या साहित्य पुरवठ्यातून इस्लामिक स्टेटचे (इसिस) घातक बॉम्ब आणि इतर दारूगोळा तयार होत असल्याचे एका अभ्यासात आढळून आले.

अंकारा : २० देशांतील कंपन्यांकडून होत असलेल्या साहित्य पुरवठ्यातून इस्लामिक स्टेटचे (इसिस) घातक बॉम्ब आणि इतर दारूगोळा तयार होत असल्याचे एका अभ्यासात आढळून आले. या पुरवठा साखळीत सात भारतीय कंपन्यांचा समावेश आहे हे उल्लेखनीय. इसिसला विरोधी देशांतूनच साहित्य पुरवठा होत असल्याचे समोर आणत रसायने, केबल्स व इतर साहित्यांच्या प्रवाहावर नजर ठेवण्यासाठी सरकारे तसेच कंपन्यांना अधिक उपाय योजावे लागतील, असे या अहवालातून सुचविण्यात आले आहे. इसिसने आयईडी बनविण्यासाठी वापरलेल्या ७०० हून अधिक घटकांचा तुर्की, ब्राझील आणि अमेरिकेतील ५१ कंपन्यांशी संबंध आहे, असे कॉनफ्लिक्ट आर्मामेन्ट रिसर्चच्या (सीएआर) अभ्यासात आढळून आले. या कंपन्यांनी संबंधित घटकांची निर्मिती किंवा विक्री केली. इसिसकडून आयईडीचे आता निम औद्योगिक स्तरावर उत्पादन केले जात असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. सीएआरने २० महिने अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. ‘या स्वस्त आणि तयार साहित्याच्या विक्रीचे शस्त्रविक्रीच्या तुलनेत कमी नियमन होते. यातील काही घटकांना तर निर्यातीसाठी सरकारच्या परवान्याचीही गरज नाही. त्यामुळे इसिसला अत्यंत सहजरीत्या हे घटक प्राप्त होतात, असे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले. इसिसची ही रसद तोडण्यासाठी उत्पादक कंपन्यांना विक्रीपश्चात हे घटक नेमके कुठे जातात यावर बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. तशी प्रणाली संबंधित कंपन्यांकडे असल्यास त्या प्रतिरोधकाचे काम करू शकतील,’ असे सीएआरचे कार्यकारी संचालक जेम्स बेवन म्हणाले. सीएआरला इराकी फेडरल पोलीस, वॉशिंग्टनपुरस्कृत कुर्दिश वायपीजी आणि कुर्दिस्तान रिजनल सेक्युरिटी कौन्सिल आणि कुर्दिस्तान रिजनल गव्हर्नर्मेंटच्या सुरक्षा दलांकडून या घटकांचे नमुने मिळाले होते. इसिसचा सिरिया व इराकच्या मोठ्या भूभागावर ताबा आहे. या दोन्ही देशांचा शेजारी असलेल्या तुर्कीने इसिसचा शस्त्रपुरवठा रोखण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. विरोधाभास म्हणजे इसिसच्या साहित्य पुरवठा साखळीतील कंपन्यांपैकी सर्वात जास्त १३ कंपन्या तुर्कीच्या आहेत. त्याखालोखाल भारताचा क्रमांक लागतो. इसिसला साहित्य पुरवठा करणाऱ्या साखळीत भारताच्या सात कंपन्यांचा समावेश आहे.