बाळ जन्मलं की पहिल्यांदा चौकशी होते की ते किती वजनाचं आहे. कोणी सात पौंडाचं, कोणी दहा पौंडाचं असतं. ते उत्तर ऐकल्यावर बाळ गुटगुटीत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जाते. पण व्हिएटनाममध्ये एका बाळाचं जन्मत:च वजन होतं तब्बल सात किलो. डॉक्टर म्हणाले की त्या बाळाला पाहून ते पाच किलो वजनाचं असेल, असं वाटलं होतं. पण नेहमीच्या पद्धतीनं वजन केलं, तर ते सात किलो भरलं. आम्हालाच खरं वाटेना. म्हणून पुन:पुन्हा वजन केलं आणि बाळ सात किलोचं असल्याची खात्री करून घेतली. बाळाचं वजन असंच वाढत गेलं तर त्याला उचलणंही आई-वडिलांना अवघड झाल्याशिवाय राहणार नाही. यापूर्वी २00८ सालीही व्हिएटनाममध्येच आठ किलो वजनाचं बाळ जन्मलं होतं. पण १९५५ साली इटालीत एका महिलेनं ज्या बाळाला जन्म दिला, त्याचं वजन होतं तब्बल १0 किलो २0 ग्रॅम. त्याची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली होती. तो रेकॉर्ड अद्याप मोडला गेलेला नाही.
बाळाचे वजन सात किलो, व्हिएटनाममधील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 1:14 AM