शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

ग्रीन कार्डवरील ७ टक्के मर्यादा अखेर अमेरिकी प्रतिनिधीगृहाने हटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 5:55 AM

सर्वाधिक फायदा भारतीयांना; काम करणाऱ्या गुणवंतांना होणार लाभ

वॉशिंगटन : ग्रीन कार्डवर प्रत्येक देशासाठी असलेली ७ टक्क्यांची मर्यादा हटविणाºया विधेयकास अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधीगृहाने (काँग्रेस) मंजुरी दिली. अमेरिकेत काम करणाºया गुणवंत कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार असून त्यात भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे.

ग्रीन कार्डमुळे विदेशी नागरिकांना अमेरिकेत कायमस्वरूपी राहणे व काम करण्याची परवानगी मिळते. सात टक्क्यांच्या मर्यादेमुळे भारतासारख्या देशातील नागरिकांना या कार्डसाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागत होती. त्यांची प्रतीक्षा आता संपेल. हे विधेयक कायद्यात रूपांतरित होताच कौटुंबिक आधारावरील व्हिसाचा प्रति राष्ट्र कोटा ७ वरून १५ टक्के होईल. रोजगार आधारित आव्रजन व्हिसाचा ७ टक्के कोटा संपुष्टात येईल.‘फेअरनेस फॉर हाय-स्किल्ड इमिग्रेशन अ‍ॅक्ट २0१९’ नावाचे हे विधेयक प्रचंड बहुमताने मंजूर झाले. ४३५ सदस्यांच्या प्रतिनिधीगृहात विधेयकाच्या बाजूने ३६५ मते पडली, तर विरोधात अवघी ६५ मते पडली.

लोकप्रतिनिधीगृहाच्या मंजुरीनंतर हे विधेयक आता सिनेटमध्ये जाईल. तेथे मंजुरी मिळाल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल व त्याच्या अंमलबजावणीचा आदेश राष्ट्राध्यक्ष जारी करतील. सिनेटमध्ये सत्ताधारी रिपब्लिकन पार्टीचे बहुमत आहे. त्यामुळे हे विधेयक सहजपणे मंजूर होईल, असे सूत्रांनी सांगितले.

अनेक जण ७० वर्षांपासून प्रतीक्षेतअलीकडे करण्यात आलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले होते की, एच-१बी व्हिसावर आलेले अनेक आयटी व्यावसायिक भारतीय ७0 वर्षांपेक्षाही अधिक काळापासून ग्रीन कार्ड मिळण्याची वाट पाहत आहेत. सध्याच्या व्यवस्थेत एच-१बी व्हिसाधारकांना सर्वाधिक प्रतीक्षा लागत होती. विशेष म्हणजे हे लोकच सर्वाधिक गुणवत्ताधारक आहेत.

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसा