नवी दिल्ली : चीनमध्ये बँकांची कर्जे थकविणाऱ्या लोकांविरुद्ध धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. चीनच्या सर्वोच्च न्यायालयाने कर्ज बुडवणाऱ्या ६.७३ दशलक्ष लोकांवर अनेक कठोर निर्बंध लादले आहेत. या लोकांना आता बुलेट ट्रेन अणि विमानाने प्रवास करता येणार नाही. नव्या कर्जासाठी तसेच के्रडीट कार्ड मिळण्यासाठी अर्जही करता येणार नाही.चीनच्या सर्वोच्च न्यायालयाने कर्ज बुडव्यांची काळी यादी तयार केली आहे. या यादीत ६.७३ दशलक्ष लोकांचा समावेश आहे. या लोकांना आता स्वत:ला कर्ज तर घेता येणार नाहीच, पण त्याचबरोबर कोणाला कर्ज देण्याची ते शिफारसही करू शकणार नाहीत. सूत्रांनी सांगितले की, कर्ज बुडव्यांच्या विरोधात कशी कारवाई केली जाऊ शकते, याचे उदाहरणच चीनने भारतासमोर घालून दिले आहे. भारतीय बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून विजय मल्ल्या विदेशात फरार झाले आहेत. त्याच्या आठवणी चीनच्या कारवाईने जाग्या केल्या आहेत. चीनमधील सरकारी दैनिक ग्लोबल टाइम्सने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अंमलबजावणी विभागाचे प्रमुख मेंग झियांग यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. प्रशासनाने विमान कंपन्या आणि रेल्वे कंपन्यांशी संपर्क साधून निर्णयाच्या अंमलबजावणीची खात्री केली आहे. (वृत्तसंस्था)बड्या लोकांचाही समावेशकाळ््या यादीत सरकारी अधिकारी, स्थानिक विविधमंडळ सदस्य, राजकीय सल्लागार मंडळाचे सदस्य, कम्युनिस्ट पार्टी आॅफ चायना काँग्रेसचे प्रतिनिधी अशा बड्या लोकांचा समावेश आहे. काही लोकांनी स्वत:च या बंदीची अंमलबजावणी सुरू केली आहे. 71 हजार लोकांना कॉर्पोरेट प्रतिनिधित्व करण्यास तसेच कार्यकारी पदे स्वीकारण्यास बंदी घालण्यात आली आहे. ५,५0,000 लोकांना कर्ज आणि क्रेडिट मिळविण्यासाठी अर्ज करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बंदीची अंमलबजावणी चीनी औद्योगिक अणि व्यावसायिक बँकेकडून केली जाणार आहे. ही बंदी पासपोर्टनुसार आमलात आणली जाणार आहे. या आधी ओळखपत्रानुसार प्रवास बंदी घालण्याचा प्रयत्न झाला होता.
७० लाख कर्जबुडव्यांची चीनमध्ये आर्थिक नाकेबंदी
By admin | Published: February 21, 2017 4:30 AM