भूकंपाच्या तीव्र झटक्यांनी जपान पुन्हा एकदा हादरले आहे. रिक्टर स्केलवर या धक्क्यांची तीव्रता ७.१ एवढी नोंदवली गेली आहे. तसेच भूकंपाच्या या झटक्यांनंतर त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे.
जपानमध्ये भूकंपाचे हे तीव्र झटके क्यूशू आणि शिकोकू बेटांवर जाणवले. भूकंपासोबतच जपानमधील मियाजाकी, कोटी, इहिमे, कागोशिमा आणि आइता येथे त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, प्रशासनाकडून परिस्थितीवर बारीक नजर ठेवण्यात येत आहे. तसेच मियाजाकी येथे समुद्रात रोजच्यापेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळत अससल्याचं दिसत आहे.
शेकडो बेटांवर वसलेल्या जपानमध्ये सातत्याने भूकंप येत असतात. तसेच समुद्रात भूकंप झाल्यानंतर त्सुनामी येऊन किनारी भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं.