आज फिलिपाइन्समधील मिडानाओ येथे ७.४ तीव्रतेचा भूकंप झाला असून त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, हा भूकंप रात्री ८:०७ वाजता झाला. भूकंपाचा केंद्र जमिनीत ५० किलोमीटर खोलीवर होते.
वृत्तानुसार, युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजिकल सेंटर (EMSC) ने या भूकंपाची तीव्रता ७.५ आणि त्याचा केंद्रबिंदू ६३ किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगितले. भूकंपानंतर अमेरिकन त्सुनामी वॉर्निंग सिस्टमने सुनामीचा इशारा दिला होता.