शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव कॅनडात दिमाखात साजरा!

By मनोहर कुंभेजकर | Published: August 22, 2022 10:27 AM

Azadi Ka Amrit Mahotsav : भारताच्या स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव कॅनडात आज दुपारी 1.30 ते 4 या वेळेत सुमारे अडीच तीन तास कॅनडात (भारतीय वेळेनुसार मध्यरात्री) स्थायिक झालेल्या आपल्या 28 राज्यां मधील सुमारे 15000 भारतीयांनी दिमाखात साजरा केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा या आवाहनाला प्रतिसाद देत कॅनडात स्थायिक झालेल्या लाखो भारतीयांनी देशाच्या स्वातंत्र्याचा 75 व्या अमृत महोत्सवदिनी आपल्या घरांवर तिरंगा फडकवला होता. मात्र, काल रविवारची येथे सुट्टी असल्याने कॅनडा,टोरंटो येथील नॅथन फिलिप्स स्क्वेअर परिसरात  सुमारे 15000 भारतीयांनी वाजत गाजत सुमारे 2 किमीची भव्य तिरंगा यात्रा काढली.

भारताच्या स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव कॅनडात आज दुपारी 1.30 ते 4 या वेळेत सुमारे अडीच तीन तास कॅनडात (भारतीय वेळेनुसार मध्यरात्री) स्थायिक झालेल्या आपल्या 28 राज्यां मधील सुमारे 15000 भारतीयांनी दिमाखात साजरा केला. टोरंटो येथील नॅथन फिलिप्स स्क्वेअर परिसरात  वाजत गाजत सुमारे 2 किमीची भव्य तिरंगा यात्रा देशाचा झेंडा फडकवत काढण्यात आली. पॅनोरमा इंडियाने ही तिरंगा रॅली आयोजित केली होती.

यावेळी भारतातील विविध राज्यातील नागरिकांनी आपली कला, नृत्य सादर केले. यात मराठी नागरिकांचे ढोलताशांच्या गजरात त्यांनी सादर केलेले लेझीम, पंजाबी नागरिकांचे भांगडा नृत्य, गुजराथी नागरिकांचा गरबा यांनी या तिरंगा रॅलीत शोभा आणली. तर स्टेजवर अनेक सांस्कृतिक आणि संगीत मैफिल कार्यक्रमांचा उपस्थित हजारो नागरिकांनी आस्वाद घेतला. 

या तिरंगा रॅलीत मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. गणपती  बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी,भारत माता की जय असा  जयघोष करत डोक्यावर फेटा व नऊवारी साडी अश्या आपल्या मराठमोळ्या वेशभूषेत महिलांनी लेझीम सादर केले. नाशिक ढोलच्या गजरात संपूर्ण परिसारत जल्लोष आणि उत्सवचे वातावरण होते. बॉलीवूड स्टार्स मुग्धा गोडसे आणि राहुल देव यांनी या तिरंगा रॅलीत सहभाग घेतला.

येथे अनेक खाद्य पदार्थांची रेलचेल होती. येथे विविध प्रकारचे अनेक खाद्यस्टॉल्स लावण्यात आले होते. अनेकांनी वडापावचा आणि अन्य खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला. तर येथील परदेशी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती. येत्या 31 ऑगस्टला कॅनडात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त खास विक्रीसाठी डेकोरेशनच्या साहित्याचा देखिल येथे स्टॉल होता.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनCanadaकॅनडा