शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
4
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
5
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
6
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
9
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
10
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
11
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
12
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
13
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
14
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
15
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
16
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
17
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
18
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
19
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
20
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला

तब्बल ३५ हजार रुपये खर्च करुन केलं हेअर ट्रान्सप्लांट, पण आरशात बघताच रडु लागली महिला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 8:11 PM

यूकेतील एका वृद्ध महिलाही टक्कल पडण्याच्या समस्येला वैतागली होती. अखरे तिने एक उपाय करण्याचा ठरवलं आणि त्याचा परिणाम पाहून तिला धक्काच बसला.

केसगळती (Hairfall)  ही सध्या बऱ्याच लोकांमध्ये असलेली समस्या (Hair problem). अगदी कमी वयापासूनच केस गळू लागतात आणि लवकरच टक्कल (Baldness) पडतं. केस गळू नयेत, नव्या केसांची वाढ व्हावी म्हणून लोक किती तरी उपाय करतात. पण काही वेळा हे उपाय यशस्वी होतात तर काही वेळा त्याचा उलट परिणामही होऊ शकतो. यूकेतील एका वृद्ध महिलाही टक्कल पडण्याच्या समस्येला वैतागली होती. अखरे तिने एक उपाय करण्याचा ठरवलं आणि त्याचा परिणाम पाहून तिला धक्काच बसला.

यूकेतील (UK) ७४ वर्षांची ब्रेंडा. एका आजारामुळे वयाच्या २० व्या वर्षांपासून तिचे केस गळू लागले. तिला टक्कल पडलं आणि तिचा आत्महविश्वासही कमी झाला आणि तिनं स्वतःला घरातच कैद करून घेतलं. असं कधीपर्यंत घरात बंदिस्त राहणार हा विचार करून तिने यावर मार्ग शोधायचं ठरवलं. ती हेअर क्लिनिकमध्ये गेली. तिच्या तिच्यावर हेअर ट्रान्सप्लांट (Hair Transplant) करण्यात आलं.

हेअर ट्रान्सप्लांटची प्रक्रिया सुरू असताना ब्रेंडाच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली. हेअर ट्रान्सप्लांट पूर्ण झाल्यानंतर तिच्या डोळ्यांवरील पट्टी हटवली तिने स्वतःला आरशात पाहिलं. तेव्हा तिला रडूच कोसळलं. ती स्वतःलाही ओळखू शकत नाही. खऱ्या केसांपासून तयार करण्यात आलेले हेअर सिस्टम तिला ट्रासप्लांट केलं गेलं, जे अगदी तिचेच नैसर्गिक केस असल्यासारखं दिसत होतं.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार,  ब्रेंडाचा हा व्हिडीओ टिकटॉकवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. नेटिझन्सनी तिच्या सौंदर्यचं कौतुक केलं आहे. अगदी ती विशीतील तरुणी दिसते आहे, अशी कमेंट काही युझर्सनी केली आहे. तिचा ८१ वर्षांचा नवरा ब्रायनही तिला पाहून थक्क झाला. जणू काही आपल्यापेक्षा २० वर्षांनी लहान महिलेसोबत आपण लग्न केल्यासारखं वाटतं आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटकेWomenमहिला