ऑनलाइन लोकमतहवाना, दि. 30 - क्युबामध्ये विमान दुर्घटना होऊन जवळपास 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एंटोनोव्ह एन-26 विमानाला अपघात झाला होता. या विमानातील प्रवाशांमधील 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती एएफपी या वृत्तसंस्थेनं दिली आहे. हे विमान क्युबन एअरलाइन्सचं होतं. विमान क्युबामधील पिनर डेल रियो प्रांतात दुर्घटनाग्रस्त होऊन जमिनीवर कोसळल्याचीही प्राथमिक माहिती मिळाली आहे. स्थानिक मीडियानुसार, विमानातील 8 प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. मात्र अद्यापही किती जण मृत्युमुखी पडले आहेत, याची अद्याप खातरजमा झाली नाही. या विमानानं बाराकोआ विमानतळावरून उड्डाण घेतलं होतं. मात्र ते पिनर डेल रियो प्रांतात आल्यावर दुर्घटना ग्रस्त झालं. क्रांतिकारी सशस्त्र दलाच्या मंत्रालयाचे एक कमिशन दुर्घटनेची कारणे शोधत आहेत. सोव्हिएत युनियनच्या काळात क्युबामधील बहुतेक विमानं तयार करण्यात आली आहेत. एंटोनोव्ह एन-26 विमानाची निर्मितीही 1986 ते 1969 या काळात करण्यात आली होती. तसेच 2010च्या दरम्यानही एरो कॅरिबियन हे विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे दुर्घटनाग्रस्त झालं होतं. त्यावेळी या विमानातील 68 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
#BREAKING Plane crash in Cuba kills eight members of the military: official— AFP news agency (@AFP) April 29, 2017