शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

मिसिसिपीमध्ये झालेल्या गोळीबारात 8 जणांचा मृत्यू, संशयिताला अटक

By admin | Published: May 28, 2017 9:06 PM

अमेरिकेतल्या मिसिसिपी येथे एका व्यक्तीनं केलेल्या गोळीबारात 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

ऑनलाइन लोकमतजॅक्सन, दि. 28 - अमेरिकेतल्या मिसिसिपी येथे एका व्यक्तीनं केलेल्या गोळीबारात 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या गोळीबारात डेप्युटी शेरीफचाही समावेश आहे. संशयित गोळीबार करणा-या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मिसिसिपीतील तपास यंत्रणेचे प्रवक्ते वॉरेन स्ट्रेन यांच्या मते, लिंकन काऊंटी येथील तीन वेगवेगळ्या घरांमध्ये हा गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. संशयिताविरोधात अद्याप आरोप निश्चित करण्यात आले नव्हते. गोळीबार करण्यामागे त्याचा काय उद्देश होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हल्लेखोर पीडितांना ओळखत होता की नाही याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी इंग्लंडमधल्या मँचेस्टर अरिनामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 22 जणांचा मृत्यू झाला होता. आमच्या एका "सैनिका"ने हा हल्ला केल्याचं इसिसनं जाहीर करत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. मँचेस्टरच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा भीषण हल्ला झाला आहे, असं वक्तव्य ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी केलं होतं.मँचेस्टर अरिनामधील दहशतवादी हल्ल्याच्या वृत्तानंतर इसिसच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला होता. याचा एक व्हिडीओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. "इराकमधील हवाई हल्ल्यांचा बदला म्हणून हा हल्ला केला", असा दावाही केला जात आहे. मवारी रात्री इंग्लंडच्या मँचेस्टर शहरात झालेल्या अरियाना ग्रँडच्या पॉप कॉन्सर्टमध्ये दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात 22 जणांचा मृत्यू झाला होता. तर 59 जण जखमी झाले. या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.