कैरो : इजिप्तच्या सिनाई प्रांतात शुक्रवारच्या नमाजाला लोक मशिदीत जमले असताना दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांत आणि केलेल्या अंदाधुंद गोळीबारात २३५ लोक ठार झाले आणि १२0 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारली नसली तरी तो इसिसने घडवून आणला असावा, असा संशय आहे. लोक नमाज पढत असतानाच हा हल्ला करण्यात आला. आतापर्यंत इसिसने केलेल्या हल्ल्यात शेकडो पोलीस व जवान मृत्युमुखी पडले आहेत. इजिप्त सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.
सिनाईच्या काही भागात इसिसचे प्राबल्य वाढले आहे. उत्तर सिनाई प्रांतात इजिप्तच्या फौजांची इसिसच्या दहशतवाद्यांविरुद्ध लढाई सुरू आहे. मागच्या तीन वर्षांपासून इथे जोरदार लढाई सुरू आहे. इसिसच्या दहशतवाद्यांनी आतापर्यंत इजिप्तच्या शेकडो पोलीस आणि सैनिकांचे बळी घेतले आहेत.