काबूल : अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतात एका आत्मघाती हल्लेखोराने घडवून आणलेल्या कारबॉम्बस्फोटात ८९ जण ठार, तर ४० हून अधिक जखमी झाले. बाजारपेठ आणि मशिदीनजीक हा हल्ला करण्यात आला, अशी माहिती एका अफगाण अधिकाऱ्याने दिली. पक्तिका प्रांतातील उरगुन शहरात झालेल्या या हल्ल्यामुळे अफगाणिस्तानातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चालू वर्षअखेरीस परदेशी सैन्य मायदेशी परतणार आहेत, त्यामुळे या चिंतेत वाढ झाली आहे. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते जनरल मोहम्मद झाहीर आझमी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेली गाडी गर्दी असलेल्या बाजारात उडवून दिली. उरगुन जिल्हा पाकिस्तानच्या सीमेनजीक आहे. जखमींना प्रांत राजधानी शारण येथे हलविण्यासाठी सैन्याकडून हेलिकॉप्टर आणि रुग्णवाहिका पुरवण्यात आल्या आहेत. (वृत्तसंस्था)
आत्मघाती हल्ल्यात ८९ अफगाणी ठार
By admin | Published: July 16, 2014 2:23 AM