हूकसेट : यांचं नाव आहे एमी के्रटन. तरुणांनाही लाजवेल असा यांचा उत्साह आहे आणि वय आहे फक्त ९४. या वयातही शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर निर्णय घेतला आणि पदवीच्या परिक्षेचा अभ्यास सुरु केला. न्यू हॅम्पशायर यूनिव्हर्सिटीतून त्या चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाल्या आहेत. खरे तर ५० वर्षांनंतर पुन्हा अभ्यासाला सुरुवात करणे तसे सोपे काम नव्हते. पण, त्यांनी ठरविले आणि त्या यशस्वीही झाल्या. १९६२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला आणि चार मुलांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांना शिक्षणाकडे पाठ फिरवावी लागली. प्रशासकीय सहायक म्हणून त्यांनी अनेक वर्षे नोकरी केली. पण, आता पुन्हा एकदा त्या शिक्षणाकडे वळल्या आणि ‘बॅचलर आॅफ आर्ट’ही पदवी त्यांनी मिळविली. माझ्या आयुष्याला पूर्णत्व देण्याचा माझा प्रयत्न आहे. कारण, आपण जेंव्हा पुन्हा शाळेत जाण्याचा विचार करता तेंव्हा एका नव्या आयुष्यालाच सुरुवात होत असते, असे त्यांनी सांगितले.
९४ व्या वर्षी पदवीधर
By admin | Published: January 20, 2017 6:16 AM