इस्लामाबाद : पाकिस्तानातील ९.५ कोटी नागरिक गरिबीच्या खाईत ढकलले गेले आहेत, असे जागतिक बँकेच्या एका अहवालात म्हटले आहे. वित्तीय स्थैर्य प्राप्त करण्यासाठी सरकारने तत्काळ पावले उचलण्याची गरज आहे, असेही जागतिक बँकेने म्हटले आहे. पाकिस्तानातील एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, जागतिक बँकेने शुक्रवारी एक मसुदा धोरण अहवाल जारी केला. सर्व हितधारकांच्या मदतीने पाकिस्तानमधील आगामी सरकारसाठी हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
अहवालात म्हटले आहे की, मागील एक वर्षात पाकिस्तानातील गरिबी ३४.२ टक्क्यांवरून वाढून ३९.४ टक्के झाली आहे. पाकिस्तानातील १.२५ कोटी लोक आता दारिद्र्यरेषेखाली आले आहेत. प्रतिदिन ३.६५ डॉलरच्या उत्पन्नास पाकमध्ये दारिद्र्यरेषेची पातळी मानले जाते. ९.५ कोटी पाकिस्तानी नागरिक आता गरिबीमध्ये आयुष्य जगत आहेत.
निवडणूक कधी, हे सांगणे अशक्यपाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकीची निश्चित तारीख सांगणे शक्य नाही, असे पाकिस्तानी निवडणूक आयोगाने म्हटले आहे. निवडणुका कधी घेणार, याची तारीख निश्चित करण्याची मागणी पाकमधील राजकीय पक्षांनी एक दिवस आधीच केली होती.
लष्कराकडून हेराफेरीची शक्यता निराधार संयुक्त राष्ट्रे : आगामी निवडणुकीत पाकिस्तानी लष्कराकडून हेराफेरी केली जाऊ शकते, अशी भीती व्यक्त करणे निराधार आहे, असे प्रतिपादन पाकचे काळजीवाहू पंतप्रधान अनवर उल हक काकड यांनी केले आहे.