Big Blow to Pakistan by America: अमेरिकेची पाकिस्तानविरुद्धची कठोर भूमिका कायम आहे. पाकिस्तानच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमात मदत करणाऱ्या अनेक संस्थांवर अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने निर्बंध लादले आहेत. पाकिस्तानच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या पुरवठ्यात सहभागी असल्याचा दावा केलेल्या चिनी संशोधन संस्थेसह अनेक कंपन्यांवर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने निर्बंध लादले. मात्र या निर्णयावर चीन आणि पाकिस्तानकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. पण याने पाकिस्तानला जोरदार दणका बसला आहे.
अमेरिकन स्टेट डिपार्टमेंटने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, नियंत्रित क्षेपणास्त्र उपकरणे आणि तंत्रज्ञान याच्या प्रसारामध्ये सहभागी असलेल्या ५ संस्था आणि एका व्यक्तीवर कारवाई केली आहे. यात विशेषतः बीजिंग रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑटोमेशन फॉर मशीन बिल्डिंग इंडस्ट्री (RIAMB) या संस्थेचा समावेश आहे. स्टेट डिपार्टमेंटने मंत्रालयाच्या कार्यकारी आदेश १३३८२ नुसार या कंपनीवर बंदीची कारवाई केली आहे. ही कंपनी मोठ्या प्रमाणावर विनाश करणारी शस्त्रे बनवून त्यांचे वितरण करते.
RIAMB ही कंपनी पाकिस्तानच्या नॅशनल डेव्हलपमेंट कॉम्प्लेक्स (NDC) सोबत काम करत आहे असा संशय अमेरिकेला आहे. त्यांच्या मदतीने ज्याचा पाकिस्तान लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा विकास आणि उत्पादना या कार्यक्रमात सहभागी होत असल्याचे युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंटचे मत आहे. ही संस्था मोठ्या व्यासाच्या रॉकेट मोटर्सची चाचणी घेण्यासाठी उपकरणे खरेदी करण्याबाबत काम करत आहे. विशेषत: पाकिस्तानच्या शाहीन-3 आणि अबाबिलसह संभाव्य मोठ्या प्रणालींसाठी ही कंपनी मदत करत असल्याचे अमेरिकेचे मत आहे. त्यामुळेच या आणि इतर काही कंपन्यांवर अमेरिकेने बंदी घातली.