अनेक लोकांचं नशीब हे रातोरात बदलतं. चिलीमध्ये एका व्यक्तीसोबत असाच काहीसा प्रकार घडला आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार एक्सक्विएल हिनोजोसा त्यांचा दिवंगत वडिलांकडील वस्तूंची पाहणी करत होते. तेव्हा त्यांना साठ वर्षांपूर्वीचं एक बँकेचं पासबूक सापडलं. या पासबूकामुळे त्यांचं नशिबच पालटलं.
१९६०-७० च्या दशकामध्ये हिनोजोसा यांचे वडील घर खरेदी करण्यासाठी बचत करत होते. पासबूकवरील आकडेवारीवरून त्यांनी १४०,००० पेजोस (दोन लाख रुपये) एवढी बचत झाली होती. मात्र व्याज आणि वाढत्या महागाईबरोबर ही रक्कम आता १ बिलियन पेसो (८.२२ कोटी रुपये) एवढी झाली आहे.
एक्सक्विएल हिनोजोसा यांच्या वडिलांचा १० वर्षांपूर्वीच मृत्यू झालेला होता. तसेच कुटुंबातील कुणालाही त्यांचं हे खास बँक खातं आणि बचतीबाबत माहिती नव्हती. त्यांच्या मृत्यूनंतर हे पासबूक अनेक एका खोक्यामध्ये पडून होते. शेवटी घराची साफसफाई करत असताना ते हिमोजोसा यांना सापडले.
मात्र त्यांच्या वडिलांचं हे बँक पासबूक खूप आधीच बंद पडलं होतं. मात्र त्यांना जे पासबूक सापडलं होतं. त्यावर एक महत्त्वपूर्ण उल्लेख होता. त्यावर स्टेट गॅरंटी असा उल्लेख होता. याचा अर्थ ही रक्कम बँकेने दिली नाही तर ती सरकार त्याचं नियंत्रण घेईल असा होता. मात्र सध्याच्या सरकारने हे पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर हिनोजोसा यांनी कायदेशीर पावले उचलली. अनेक न्यायालयांनी हिनोजोसा यांच्या बाजूने निर्णय़ दिला. मात्र सरकारने कोर्टाच्या प्रत्येक निर्णयाला आव्हान दिले.
ही रक्कम वडिलांच्या मेहनतीतून केलेल्या बचतीमधून उभी राहिलेली आहे, असा युक्तिवाद हिनोजोसा यांनी प्रत्येक वेळी केला. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय सुनावला. तसेच त्यांना १ बिलियन चिली पेसोस ( सुमारे १० कोटी रुपये) भरपाई म्हणून देण्याचे आदेश सरकारला दिले.