लंडन : ब्रिटनमध्ये ३० वर्षीय ॲस्टेफानिया आणि २७ वर्षीय अजहारा या समलिंगी जोडप्याने नवीन तंत्रज्ञानाची मदत घेत डेरेक अलॉय या मुलाला जन्म दिला. यासाठी दोघींनी इनव्होसेल हे नवीन तंत्रज्ञान वापरले.
मार्च महिन्यात बाळासाठीची प्रक्रिया सुरू झाली आणि डेरेकला जन्म देणारे अंडे ॲस्टेफानियाच्या गर्भाशयात फलित झाले. त्यानंतर या अंड्याला अजहाराच्या गर्भाशयात हलविण्यात आले. ते ९ महिने तिच्या गर्भाशयात ठेवले. या तंत्रात, अंगठ्याच्या आकाराचे लहान कॅप्सूल योनीमध्ये ५ दिवसांसाठी सोडले जाते.
किती आला खर्च? ॲस्टेफानिया, अजहरा यांना इनव्होसेलद्वारे डेरेकला जन्म देण्यासाठी ५,४८९ अमेरिकन डॉलर्स (साधारण ४ लाख ५७ हजार रुपये) खर्च करावे लागले.