केप टाऊन - दक्षिण आफ्रिकेतील स्कॉट वेन जाईल यांचा अशा शिकाऱ्यांमध्ये समावेश होता ज्यांनी त्यांच्या संपूर्ण जीवनात शेकडो मुक्या जनावरांची शिकार केली होती. मात्र या मुक्या जनावरांना विनाकारण मारण्याच्या कृतीचे कुणीही समर्थन करणार नाही. त्यामुळेच जगातील सर्वात मोठ्या शिकाऱ्यांपैकी एक असलेल्या स्कॉट वेन जाईल यांचा मृत्यू झाला तेव्हा दु:खाऐवजी आनंद साजरा करण्यात आला. एका हंटिंग ट्रिपदरम्यान, मगरीने स्कॉटला आपलं भक्ष्य बनवले.
स्कॉट वेन जाईल हे केवळ शिकारीच नव्हते तर शिकारी असण्यासोबतच ते एका सफारी कंपनीचे संचालनही करत होते. तिथे ते लोकांना आपल्यासोबत शिकारीला घेऊन जात असत. तसेच शिकारीदरम्यान, ते स्वत: वाघ, चिता, जिराफ आणि हत्तीसारख्या प्राण्यांची शिकार करत असत. तसेच इतरांनाही शिकार कशी करावी हे शिकवत असत. मात्र केवळ हौसेसाठी शिकार करणारे शिकारी टीकेचे धनी होत असतात. त्यामुळेच जाइल यांच्या मृत्यूनंतर त्यांना कर्माचं फळ मिळालं असं, लोक म्हणत आहेत.
वेन जाईल २०१७ मध्ये झिम्बाब्वेमध्ये शिकारीसाठी गेले होते. मात्र ते पहिल्यांदाच जेव्हा शिकारीहून परत आले नाहीत. तर ते स्वत:च शिकार झाले. खूप वेळ वाट पाहिल्यानंतरही ते जेव्हा सापडले नाहीत तेव्हा कुत्र्यांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र ते कुठेही सापडले नाहीत. काही अंतरावर त्यांचं सामान सापडले. ते मगरींच्या शोधात गेले होते. मात्र ते तिथून बेपत्ता झाले. काही अंतरावर नदीकिनारी त्यांचं काही सामान आणि पायांचे अवशेष सापडले. अधिकाऱ्यांनी तपास केला असता डीएनएच्या तपासणीत हे अवशेष जाइल यांचेच असल्याचे स्पष्ट झाले.
वन ग्रीन प्लॅनेटने या शिकाऱ्याच्या मृत्यूबाबत सांगितले की, त्यामुळेच ट्रॉफी हंटिंगची परवानगी देता कामा नये. ही बाब स्वत: शिकाऱ्यांसाठीही घातक ठरू शकते. तर एकाने लिहिले की, शिकारीचा रोमांच हा स्वत:च्या जीवापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.