शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

भारतात अल्पसंख्यांकांसोबत भेदभाव होतो? अमेरिकन पत्रकाराच्या प्रश्नावर मोदींनी दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 00:08 IST

भारतातील अल्पसंख्याक समुदायाबद्दल अमेरिकेतील पत्रकाराने मोदींनी प्रश्न विचारला

वाशिंग्टन - अमेरिकेच्या दौऱ्यावर असणारे पंतप्रधान आज वॉश्गिंटन डीसीत होते. मोदींच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हाईट हाऊसला पोहचले. याठिकाणी मोदींचे भव्यदिव्य स्वागत झाले. तिथे मोदी आणि बायडन प्रशासन यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. तर, दोन्ही देशांत महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या. त्यानंतर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. तसेच, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली. 

भारतातील अल्पसंख्याक समुदायाबद्दल अमेरिकेतील पत्रकाराने मोदींनी प्रश्न विचारला. त्यावेळी, लोक म्हणतात.. भारतातील अल्पसंख्यांक समुदायासोबत भेदभाव केला जातो, असं ह्युमन राईट्स आणि लोकांचं म्हणणं आहे? असा प्रश्न विचाारण्यात आला. त्यावर, मोदींनी भारत हा लोकशाहीप्रधान देश असल्याचं म्हटलं. मला आश्चर्य होतंय की तुम्ही म्हणता लोकं म्हणतात.. लोकं म्हणतात... पण भारत लोकशाहीप्रधान देश आहे. जसं की राष्ट्रपती जो बायडन यांनी म्हटलं की, भारत आणि अमेरिका दोन्ही देशांचा डीएनए लोकशाही आहे, लोकशाही आमच्या रक्तात आहे, लोकशाही आम्ही जगतो, आमच्या पूर्वजांनी संविधानच्या रुपाने ते शब्दबद्ध केलं आहे, असे मोदींनी म्हटले.

तसेच, आमचं सरकार लोकशाहीच्या मुलभूत तत्त्वांच्या आधारावरच चालत आहे. आमचं संविधान आणि आमचं सरकार, आम्ही सिद्ध केलंय की, जात, पंथ, धर्म, लिंग यांसारख्या कुठल्याही भेदभावाला तेथे थारा नाही. जेव्हा आपण लोकशाहीची गोष्ट करतो, लोकशाही जगतो, तेव्हा भेदभावाचा कुठलाही प्रश्न उपस्थित होत नाही. म्हणूनच, भारत सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास या मूलभूत सिद्धांतांना घेऊन चालत आहे, असं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी दिले.  

जगभरातील अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची भागिदारी

आजचा दिवस भारत आणि अमेरिका यांच्या संबंधासाठी ऐतिहासिक आहे. आजच्या आमच्या चर्चेतून आणि घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयातून कॉम्प्रिहेंसिव ग्लोबल स्ट्रैटेजिक पार्टनरशिपमध्ये आमचा नवीन अध्याय जोडला गेला आहे. यातून एक नवीन दिशा आणि नवी ऊर्जा मिळाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत म्हटलं. भारत-अमेरिका मैत्री ही केवळ दोन्ही देशांसाठीच महत्त्वपूर्ण नसून जगातील अर्थव्यवस्थेसाठीही महत्त्वाची आहे. आज अमेरिका भारताचा सर्वात मोठा ट्रेड पार्टनर असून दोन्ही देशातील व्यापारासंबंधित प्रलंबित मुद्दे संपवून एक नवी सुरुवात करणार आहोत. 

अमेरिकेत १० लाख नोकऱ्यांसाठी मदत

आम्ही एकत्र येऊन असिमीत क्षमतेच्या भविष्याची दारं खुली करत आहोत. स्वच्छ ऊर्जा परिवर्तनमध्ये तेजी आणण्यासाठी अंतराळातील उड्डाणांवर सहयोग आणि क्वांटम कंप्यूटिंग व कृत्रिम बुद्धिमत्तेवर सहकार्याची गरज आहे. एयर इंडियाद्वारे बोइंग विमान खरीदीच्या करारामुळे अमेरिकेत १० लाख नोकऱ्यांची मदत होईल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मोदींसमवेतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडनIndiaभारतdemocracyलोकशाही