सौदी अरेबियातील मक्का येथे सोन्याचा मोठा साठा सापडला आहे. सौदीने नुकतीच याबाबत घोषणा केली आहे. सौदी अधिकाऱ्यांनी त्यांच्या घोषणेमध्ये सांगितले की, मक्का क्षेत्रातील अल खुर्मा गव्हर्नरेटमधील मन्सौराह मसारा सोन्याच्या खाणीच्या दक्षिणेला १०० किमी अंतरावर सोन्याचे साठे सापडले आहेत.
इराणमध्ये जनरल कासीम सुलेमानीच्या कबरीजवळ भीषण स्फोट; 105 जणांचा मृत्यू 170 जखमी
सौदी अरेबियाची खाण कंपनी सौदी अरेबियन मायनिंग कंपनीने म्हटले आहे की, या भागात सोन्याचे अनेक साठे सापडले आहेत, यावरून या भागात खाणकाम होण्याची शक्यता असल्याचे दिसून येते. मॅडनने २०२२ मध्ये सोन्याचा शोध घेण्यासाठी एक व्यापक कार्यक्रम सुरू केला होता आता या मोहिमेला येश आले आहे. मन्सूरह मसाराजवळ सोन्याचा साठा सापडल्याच्या पार्श्वभूमीवर, मॅडेनने २०२४ मध्ये त्याच्या आसपासच्या भागात ड्रिलिंगच्या कामाला गती देण्याचे नियोजन सुरू केले आहे.
मादेन मन्सौराह मसारा खाण तसेच खाणीच्या उत्तरेस २५ किमी अंतरावर असलेल्या जबल अल-गद्रा आणि बीर अल-तविला येथे ड्रिलिंग ऑपरेशन्स देखील चालवतात. या भागातील उत्खननाचे सकारात्मक परिणाम मिळाले असून १२५ किलोमीटर अंतरावर सोने उत्खनन केले जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सौदी अरेबियात जागतिक दर्जाचा सोन्याचा पट्टा विकसित होईल.
२०२३ च्या अखेरीस, मन्सौराह मसाराने अंदाजे ७ मिलियन औंस सोन्याचे स्त्रोत आणि प्रति वर्ष २५०,००० औंस उत्पादन क्षमता काढण्याची अपेक्षा आहे.
या देशात सर्वाधिक सोनं
अंटार्क्टिका वगळता जगात सर्वत्र थोडेसे सोने तयार होते. सर्वाधिक सोन्याचे उत्पादन चीनमध्ये होते. २०२२ च्या आकडेवारीनुसार, चीन हा जगातील सर्वात मोठा सोने उत्पादक देश आहे जो जागतिक सोन्याच्या उत्पादनाच्या १०% उत्पादन करतो. २०२२ मध्ये चीनने ३७५ टन सोन्याचे उत्पादन केले. चीननंतर सर्वाधिक सोन्याचे उत्पादन रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका आणि घाना या देशांमध्ये होते.