प्रवाशाच्या जेवणात जिवंत उंदीर मिळाल्याने अक्षरशः विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्याची वेळ आली. एढेच नाही, तर हे विमान दुसऱ्या मार्गावरही वळवण्यात आले. परिणामी, प्रवाशांना एका दुसऱ्या विमानाने त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी सोडावे लागले. ही घटना नॉर्वेमध्ये घडली आहे आणि तीही एका उंदरामुळे...
इमरजन्सी लँडिंग - ही गमतीशीर घटना घडली 18 सप्टेंबरला. ओस्लो-मलागा दरम्यान उड्डाण करणाऱ्या एसएएस एअरलाइन्सच्या SK4683 विमानाने एक प्रवासी प्रवास करत होता. याच वेळी त्याने घेतलेल्या अन्नात जिवंत उंदीर निघाला. यानंतर विमानाचे इमरजन्सी लँडिंग करण्यात आले.
यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव फ्लाइट क्रूने विमान डेनमार्कची राजधानी असलेल्या कोपेनहेगनच्या दिशेने वळवण्याचा निर्णय घेतला. यानंतर, एसएएस प्रवासी विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आणि ते कोपेनहेगनला पोहोचले. या विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने सोशल मीडियावर लिहिले आहे की, 'विश्वास ठेवा अगर ठेवू नका, माझ्या शेजारी बसलेल्या एका एका महिलेने तिचे अन्न उघडले आणि त्यातून उंदराने उडी मारली." यानंतर ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे.
का करावे लागले लँडिंग? -स्कँडिनेव्हियन एअरलाइन्सने या लँडिंगची पुष्टी करत मेडिकल इमरजन्सी, असे कारण सांगितले आहे. स्कँडिनेव्हियन एअरलाइन्सने म्हटले आहे की, एका प्रवाशाच्या अन्नात एक उंदीर निघाला. यानंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. नॉर्वेची राजधानी ओस्लो येतून स्पॅनिश शहर मालागासाठी उड्डाण घेणाऱ्या विमानाला डेनमार्कच्या कोपनहेगनमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. यासाठी एअरलाइनने प्रवाशांच्या झालेल्या गैरसोईबद्दल माफीही मागितली आहे.