लंडन : ऑस्ट्रियन कलाकार गुस्ताव क्लिम्ट यांचे ‘पोर्ट्रेट ऑफ फ्रौलिन लिझर’ नावाचे हरवलेले चित्र व्हिएन्ना येथे सुमारे १०० वर्षांनी सापडले आहे. त्याची किंमत जवळपास साडेपाच कोटी रुपये आहे.
ही कलाकृती मूळतः ऑस्ट्रियामधील ज्यू कुटुंबातील होती आणि ती १९२५ मध्ये शेवटची सार्वजनिकरीत्या पाहिली गेली होती. त्यानंतरच्या वर्षांमध्ये तिचा ठावठिकाणा अनिश्चित होता, परंतु १९६० पासून हे चित्र सध्याच्या मालकांच्या कुटुंबाच्या ताब्यात आहे. इम किन्स्की लिलाव संस्थेने पेंटिंगची किंमत साडेपाच कोटींपेक्षा (५४ दशलक्ष डॉलर) जास्त असल्याचे म्हटले आहे. या पेंटिंगचा शोध ही कला विश्वातील एक महत्त्वाची घटना ठरली आहे. गुस्ताव क्लिम्ट हे व्हिएन्नातील इतर कोणत्याही कलाकारापेक्षा जास्त आधुनिकतावादाचे प्रतीक आहेत.