वॉशिंग्टन - आतापर्यंतचा सर्वात मोठा धुमकेतू तब्बल ३५ हजार ४०५ किमी प्रतितास वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. या कॉमेंटचे द्रव्यमान सुमारे ५०० ट्रिलियन टन एवढे आहे. त्याचं बर्फाच्छादित केंद्र १२८ किमी रुंद आहे. हे अन्य ज्ञात धुमकेतूंच्या तुलनेत ५० पटीने अधिक आहे. मात्र या धुमकेतूमुळे घाबरण्याचं कुठलंही कारण नाही. कारण अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या माहितीनुसार हा धुमकेतून सूर्यापासून १.६० अब्ज किमीपेक्षा जवळ येणार नाही.
इंडिपेंडेंटच्या रिपोर्टनुसार सी/२०१४ यूएन२७१ नावाचा धुमकेतू पहिल्यांदा नोव्हेंबर २०१० मध्ये एक दशकाच्या आधी पाहिला गेला होता. त्यावेळी तो सूर्यापासून तब्बल ४.८२ अब्ज किमी अंतराव होता. तसेच सूर्यामालेच्या किनाऱ्यावरून आपल्या केंद्राकडे प्रवास करत होता. त्याचे वस्तुमान अन्य धुमकेतूंच्या तुलनेत १, ००,००० पट अधिक आहे. हे धुमकेतू सर्वसाधारणपणे सूर्याच्या जवळ सापडताता.
पृथ्वी आणि अंतराळामध्ये टेलिस्कोपचा वापर करणाऱ्या शास्त्रज्ञांवी त्याच्यावर लक्ष ठेवले होते. त्यांच्या मते २०३१ मध्ये याचा प्रवास आपल्या शनीपासूनच्या दूर असलेल्या अंतरावर येऊन समाप्त होईल. त्यावर लक्ष ठेवणाऱ्या शास्रज्ञांना हा विशालकाय धुमकेतू असल्याचे माहिती होते. दरम्यान, नुकत्याच हबल टेलिस्कोपने घेतलेल्या माहितीमधून याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, अंतराळातून अशा वस्तूच्या आकाराची माहिती घेणे खूप कठीण आहे. कारण याच्या चहुबाजूंनी धुलीकण असल्याने ल्याला पाहणे खूप कठीण आहे. मात्र या धुमकेतूच्या चमकदार बिंदूवर लक्ष ठेवून कॉम्प्युटर मॉडेलचा वापर करून याचा शोध घेतला हा धुमकेतू अब्जावधी वर्षे जुना आहे. तसेच आमच्या सौरमालेच्या सुरुवातीच्या दिवसांचा अवशेष आहे.