मॉस्को - वॅगनर समूहाचा प्रमूख असलेल्या येवगेनी प्रिगोझिनचा विमान अपघातात मृत्यू झालाा आहे. त्याच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली आहे. प्रिगोझिनच्या मृत्यूमागे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचा हात असल्याचा दावा केला जात आहे. गेल्या जून महिन्यात वॅगनरने बंड केल्यापासूनच पुतीन येवगेनी प्रिगोझिनवर नाराज होते. तेव्हापासूनच प्रिगोझिन देश-विदेशात फिरत होता. अपघातावेळी, प्रिगोझिन आपल्या सात विश्वासू सहकाऱ्यांसह मॉस्को येथून सेंट पीटर्सबर्ग येथे जात होते. यादरम्यान त्यांच्या विमानाने हवेतच पेट घेताल आणि ते खाली कोसळले. या अपघातात तीन क्रू मेंबर्ससह एकूण 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
विमानावर रशियन सैन्याचा मिसाईल हल्ला? -प्रिगोझिनच्या मृत्यूनंतर, त्याच्या विमान अपघातामागील कारणांसंदर्भात आता चर्चा सुरू झाली आहे. प्रिगोझिनच्या वॅगनरशी संबंधित टेलीग्राम चॅनल ग्रे झोनने कुठलाही पुरवा न देता हे विमान रशिय सैन्याने पाडल्याचा दावा केला आहे. तसेच, दूसऱ्या सूत्रांनी म्हटले आहे की, प्रिगोझिनच्या विमानातील वाइन कॅरेटमध्ये बॉम्ब लपवून ठेवण्यात आला होता. यात झालेल्या ब्लास्टमुळे विमानाला अपघात झाला. मात्र, या दोन्ही दाव्यापैकी अद्याप कुठल्याही दाव्याची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. यातच, रशियाची विमान एजन्सी रोसावियात्सियानेही अपघातामागील कारणाची चौकशी सुरू केली आहे. एवढेच नाही, तर या विमानात काही तांत्रिक बिघाड होता का? यासंदर्भातही चौकशी केली जाणार आहे.
वाइन कॅरेटमध्ये बॉम्ब लपवल्याची अफवा -ब्रिटिश मिडिया द सनने एका सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, सॉस्कोहून उडण्यापूर्वी प्रिगोझिनच्या विमानात एक महागडी दारूही ठेवण्यात आली होती. याच वाइनच्या कॅरेटमध्ये बॉम्ब पवलेला असण्याचीही शक्यता आहे. याशिवाय, जमिनीवर असलेल्या काही स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे की, त्यांनी प्रिगोझिनचे विमान खाली कोसळण्यापूर्वी दोन मोठे ब्लास एकले.
मिळालेल्या माहितीनुसार दुर्घटनाग्रस्त विमानाने आफ्रिकेतून मॉस्कोसाठी उड्डाण घेतले होते. मॉस्कोमध्ये काही वेळ थांबल्यानंतर हे विमान सेंट पीटर्सबर्गसाठी रवाना झाले होते. यादरम्यान उत्तर रशियातील व्लदाईमध्ये प्रिगोझिनचे हे विमान क्रॅश झाले.