सेेऊल : उत्तर कोरियाने आंतरखंडीय मारा करणाऱ्या एका क्षेपणास्त्राची चाचणी केली. त्यामुळे त्या देशाने कोरियाला अमेरिकेवर अण्वस्त्र हल्ले करता येणे शक्य होणार आहे. या महिन्यात उत्तर कोरियाने केलेली ही महत्त्वाची क्षेपणास्त्र चाचणी आहे. उत्तर कोरियाला आपल्या अण्वस्त्र सज्जतेत वाढ करायची आहे. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून हा देश क्षेपणास्त्रांची वारंवार चाचण्या करीत आहे. शुक्रवारी उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र यशस्वी चाचणीनंतर जपानजवळील समुद्रात पडले. त्या देशाच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला रोखण्यासाठी आणखी कडक निर्बंध लागू करावेत या अमेरिकेच्या भूमिकेला रशिया व चीनने विरोध केला होता. दक्षिण कोरिया, जपान, अमेरिका यांच्यावर जरब बसविणे हा उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.जपानचे संरक्षणमंत्री यासूकाझू हमादा यांनी सांगितले की, अशा क्षेपणास्त्रांमुळे जपान व आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. उत्तर कोरियाला रोखण्यासाठी जपान दक्षिण कोरिया, अमेरिका व इतर देशांना सहकार्य करत राहणार आहे असेही हमादा म्हणाले.
अमेरिकेवर अण्वस्त्र हल्ला करण्यासाठी नवीन चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 6:24 AM