मॉस्को : रशियातील वॅग्नर गटाचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांच्या मृत्यूनंतर त्यांची एक मुलाखत व्हायरल होत आहे. यामध्ये ते उड्डाणादरम्यान विमान अपघाताबद्दल बोलत आहेत. प्रिगोझिन म्हणतात की, मी रशियाशी खोटे बोलण्यापेक्षा मरण पत्करेन. २९ एप्रिल रोजी रशियन ब्लॉगर सोमयोन पेगोव्ह यांनी त्यांची मुलाखत घेतली होती.
रशिया विनाशाच्या मार्गावर आहे. जे लोक खरे बोलतात, त्यांना संरक्षण क्षेत्रातून बाहेर फेकले जात आहे. मी आज इतके सत्य का बोलत आहे? कारण मी या देशात राहणाऱ्या लोकांपेक्षा वरचा नाही. आज त्यांच्याशी खोटे बोलले जात आहे. त्यापेक्षा मला मारले तर बरे होईल, असे प्रिगोझिन यांनी मुलाखतीत म्हटले आहे. प्रिगोझिन यांनी मुलाखतीत म्हटले की, मी खोटे बोलणार नाही. रशियात व्यवस्था बदलली नाही तर लवकरच एक दिवस विमान कोसळून अपघात होईल. (वृत्तसंस्था)
रशियाकडून पुष्टी वॅग्नर गटाचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांचा विमान अपघातात मृत्यू झाला असल्याचे स्पष्टीकरण रशियाच्या तपास समितीने दिले आहे. समितीने रविवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फॉरेन्सिक तपासणीनंतर अपघातस्थळी सापडलेल्या सर्व १० मृतदेहांची ओळख पटली. प्रिगोझिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन जाणारे खासगी विमान बुधवारी कोसळले होते.