मॉस्को - गेल्या ३ महिन्याहून अधिक काळ रशिया-यूक्रेन युद्ध(Russia Ukraine War) सुरू आहे. अद्याप या युद्धाचा निकाल लागला नाही. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन(vladimir Putin) यांच्या धाडसी निर्णयाचा जगभरातून विरोध होऊ लागला. पुतिन यांनी यूक्रेनवर हल्ला करत इतर देशांनाही धमकी दिली होती. यूक्रेनवर हल्ला केल्यानंतर पुतिन चहुबाजूने चर्चेत आले. आता एका रशियन ज्योतिषाने पुतिन यांच्या मृत्यूची भविष्यवाणी केली आहे.
प्रसिद्ध रशियन शो बॅटल ऑफ साइकिक्समध्ये सहभागी झालेल्या अलेक्झेंडर कांटोनिस्टोवने रशियाबाबत भविष्यवाणी केली आहे. क्रेमलिन प्रमुखचा दहशतवाद २०२२ च्या अखेरपर्यंत संपेल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. यूक्रेन युद्धानंतर त्यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना रशियन जनतेवर वाईट वेळ येणार आहे ज्यामुळे देशात असंतोष पसरेल असं विधान केले होते. एप्रिल मध्यापर्यंत रशियन सैन्याला यूक्रेनमधून परतण्याचे आदेश मिळतील असं त्यांनी भविष्यवाणी केली परंतु ती खरी ठरली नाही.
मिरर वृत्तानुसार आता कांटोनिस्टोवने भविष्यवाणी केली आहे की, विषबाधा अथवा शारिरीक छळसारख्या प्रकाराने गरमीच्या अखेरपर्यंत पुतिन यांची हत्या होऊ शकते. जूनच्या सुरुवातीपासून पुतिन यांच्या आयुष्यात सर्वात कठीण काळ सुरू होईल. त्यांना विष अथवा शारिरीक छळ करून मारण्याचा प्रयत्न केला जाईल. मानसिक आजारामुळे रशियाचं नेतृत्व पुतिन यांच्या निर्णयावर परिणाम होईल. ते स्वत:च्या लोकांनाच त्यांचा शत्रू मानतील. अशावेळी त्यांनी घेतलेले निर्णय त्यांच्या भविष्यासाठी धोकादायक ठरतील. पुतिन क्रेमलिन येथील त्यांच्या ऑफिसमध्ये मरू शकतात कारण जीवनाच्या शिखरावर त्यांच्या मरण्याची शक्यता अधिक आहे असं त्यांनी सांगितले आहे.
पुतिन यांच्या जीवनातील शिखर ऑगस्ट-सप्टेंबर २०२२ पर्यंत आहे. याकाळात त्यांचा मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे. पुतिन यांचा मृत्यू त्यांच्या कार्यालयातच होऊ शकतो. गुप्त ठिकाणी सुट्टी घालवल्यानंतर पुतिन आता अंडरग्राऊंड झाले आहेत. त्यांचे निकटवर्तीयच त्यांचा घात करतील अशी भीती पुतिन यांच्या मनात आहे. यूक्रेनवर हल्ला केल्यानंतर आता त्यांच्या निर्णयावर त्यांचे कट्टर समर्थकही नाराज असल्याचं त्यांना कळालं आहे.