शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
4
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
5
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
6
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
7
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
8
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
9
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
10
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
11
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
12
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
13
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
14
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
15
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
16
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
17
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
18
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
19
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

स्मार्ट घड्याळाने वाचवले महिलेचे प्राण, हृदयाचे ठोके बदलताच दिला अलार्म

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 7:59 AM

अमेरिकेतील ओहायोमध्ये अशाच एका स्मार्ट घड्याळामुळे एका आजारी महिलेचे प्राण वाचविण्यात मदत झाली.

सिनसिनाटी (अमेरिका) : स्मार्ट घड्याळ घालणे ही केवळ फॅशनच नाही तर गरजही बनत चालली आहे. सॅटेलाइट लोकेशन ट्रॅकिंग, स्टेप ट्रॅकिंगपासून ते घराबाहेर असताना कॉल करणे आदींसाठी वापर केला जातो. काही लोक शरीरातील ऑक्सिजन पातळी मोजण्यासाठी आणि हृदय गती निरीक्षणासाठीदेखील ही घड्याळ वापरतात. अमेरिकेतील ओहायोमध्ये अशाच एका स्मार्ट घड्याळामुळे एका आजारी महिलेचे प्राण वाचविण्यात मदत झाली.

येथील किम्मी वॉटकिन्स (२९) यांना अचानक अस्वस्थ वाटायला लागले. तिला चक्कर येत होती. बरे वाटण्यासाठी, महिलेने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आणि झोपी गेली. दरम्यान, तिच्या मनगटावरील स्मार्ट वॉचने तिला हृदयाच्या असामान्य गतीबद्दल अलार्म वाजवून इशारा देण्यास सुरुवात केली. चिंताग्रस्त किम्मी ताबडतोब डॉक्टरांकडे गेली. तपासणी केल्यावर तिला कळाले की तिला रक्त गोठण्याचा (सॅडल पल्मोनरी एम्बोलिझम) विकार आहे. ती सध्या रक्त पातळ करण्याची औषधी घेत आहे आणि स्टॅमिनावर काम करत आहे. डॉक्टरांच्या मते, या प्रकारच्या रक्त गोठण्याच्या बाबतीत, रुग्णांची जगण्याची शक्यता ५० टक्के असते.

जीव वाचवल्याचे श्रेय घड्याळालायापूर्वीही अनेक स्मार्ट वॉच वापरकर्त्यांनी त्यांचे प्राण वाचविण्याचे श्रेय आपल्या घड्याळ्याला दिले आहे. स्मार्ट घड्याळांमुळे लोक त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूक झाले आहेत.

झोपलेल्या महिलेला वेळीच उठवले...- किम्मी वॉटकिन्स म्हणते की, मी खूप भाग्यवान आहे की घड्याळाने मला सतर्क केले आणि मी डॉक्टरांकडे पोहोचले. - घड्याळाने मला उठवण्यापूर्वी मी सुमारे दीड तास झोपले होते आणि या स्मार्ट घड्याळाच्या अलार्मने मला जागे केले. - ती १० मिनिटांपेक्षा जास्त काळ वाजत होती. त्यावेळी महिलेच्या हृदयाची गती १७८ बीट्स प्रतिमिनिट होती, जी अत्यंत गंभीर स्थिती दर्शवत होती.

टॅग्स :Americaअमेरिका