Afghanistan's Balkh Bomb Blast । नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाला आहे. खरं तर यावेळी सरकारच्या बैठकीत बॉम्बस्फोट झाला, ज्यात राज्यपाल ठार झाले आहेत. अफगाणिस्तानच्या बाल्ख प्रांताचे तालिबानचे राज्यपाल मोहम्मद दाऊद मुझम्मील हे गुरुवारी त्यांच्या कार्यालयात झालेल्या बॉम्बस्फोटात ठार झाले, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले, अशी माहिती एएफपी या वृत्तसंस्थेने दिली.
बॉम्बस्फोटात राज्यपाल ठार दरम्यान, बाल्ख पोलिसांनी एएफपीला सांगितले की, "आज सकाळी झालेल्या स्फोटात बाल्खचे राज्यपाल मोहम्मद दाऊद मुझम्मील यांच्यासह दोन जण ठार झाले." वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचे स्वरूप अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे वझिरी यांनी सांगितले. लक्षणीय बाब म्हणजे मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो आणि जखमींचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
आतापर्यंत कोणत्याही गटाने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. अफगाणिस्तानातील तालिबान शासक आणि इस्लामिक स्टेट खोरासान यांच्यात रक्तरंजित संघर्ष सुरू असून अलीकडच्या काळात झालेल्या सर्व बॉम्बस्फोटांची जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकारली आहे. त्याचबरोबर स्थानिक अधिकाऱ्यांनी सध्या स्थानिक बाजारपेठ बंद ठेवली असून आरोपींचा शोध सुरू आहे. या हल्ल्यामागे देखील इस्लामिक स्टेटचा हात असल्याचे बोलले जात आहे, मात्र त्यांनी अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"