चीनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चीनच्या दक्षिणेकडील झुहाई शहरामध्ये सोमवारी सायंकाळी एका स्पोर्ट्स सेंटरच्या बाहेर एका कारने लोकांच्या गर्दीला धडक दिली, या धडकेत ३५ जणांचा मृत्यू झाला. तर ४३ जण जखमी झाले. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनच्या झुहाई शहरात कारच्या धडकेत जखमी झालेल्यांवर उपचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ज्यो बायडेन यांच्या पत्नीनं ट्रम्प यांच्या पत्नीला चहा-पाणासाठी बोलावलं, मिळालं धक्कादायक उत्तर!
झुहाई शहरात एका ड्रायव्हरने गर्दीवर कारची धडक दिली.या घटनेत ३५ जण ठार आणि ४३ जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सोमवारी सांगितले की, ६२ वर्षीय चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. हा हल्ला होता की अपघात याची माहिती समोर आलेली नाही. कोणताही हेतू नमूद केलेला नाही आणि पोलिसांनी तपास सुरू असल्याचे सांगितले.
या वाहनाने अनेक पादचाऱ्यांना धडक दिली आहे.ड्रायव्हरची ओळख त्याच्या फॅन नावाने झाली आहे. झुहाईच्या शांग चोंग हॉस्पिटलच्या आपत्कालीन क्लिनिकमधील कर्मचाऱ्यांनी सांगितले की ,त्यांना काही जखमी लोक मिळाले आहेत जे उपचारानंतर निघून गेले. सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओमध्ये अग्निशामक एका व्यक्तीवर सीपीआर करत असल्याचे दिसून आले.