नवी दिल्ली : राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचे पार्थिव बुधवारी चार दिवसांसाठी वेस्टमिंस्टर हॉलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या पार्थिवावर 19 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अशातच पार्थिव ठेवलेल्या हॉलमधील एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. महाराणी यांच्या पार्थिवाशेजारी उभा असलेला एक गार्ड अचानक बेशुद्ध होऊन खाली पडतो. महाराणी यांचे मागील गुरूवारी 96 व्या वर्षी निधन झाले होते. त्या 70 वर्षांपासून ब्रिटनवर शासन करित होत्या.
12 सेकंदांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमंत्री राणी यांची शवपेटी एका व्यासपीठावर ठेवल्याचे दिसून येत आहे. आजूबाजूला पहारेकरी उभे आहेत. यादरम्यान अचानक एक विचित्र घटना घडली. त्यांच्या मृतदेहाजवळ उभा असलेला काळ्या रंगाच्या पोशाखातील गार्ड बेशुद्ध पडला. दोन लोक त्याच्या मदतीला धावत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. ही घटना घडताच बीबीसीने प्रक्षेपण करण्यास बंद केले.
रॉयल गार्ड अचानक पडला बेशुद्धराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पार्थिव एडिनबर्ग विमानतळावरून लंडनसाठी पाठवण्यात आले तेव्हा तिथे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. राणी यांच्या शवपेटीसोबत त्यांची मुलगी प्रिन्सेस ॲन देखील सोबत होती, जी रॉयल एअर फोर्स (RAF) विमानाने एडिनबर्गहून लंडनला आली होती. ज्या विमानातून राणी यांची शवपेटी आणली गेली होती ते विमान जनतेच्या मदतीसाठी यापूर्वी वापरले गेले आहे.
माहितीनुसार, स्कॉटलंडमधील एडिनबर्ग येथून लंडनला राणी एलिझाबेथ द्वितीय यांची शवपेटी घेऊन जाणाऱ्या ब्रिटिश रॉयल एअर फोर्सच्या वाहतूक विमानाच्या सुरक्षेसाठी जवळपास 60 लाख लोक होते. त्यामुळे ते इतिहासातील सर्वात ट्रॅक केलेले उड्डाण बनले आहे.