शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
2
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
3
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
4
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
5
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
6
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
7
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया
8
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
9
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
10
Cheetah Kuno: कुनोतून आली वाईट बातमी! चित्त्याच्या दोन पिलांचा मृत्यू, मृतदेहांवर जखमा 
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
12
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
13
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
14
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
15
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
16
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
17
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
18
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
19
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
20
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट

आता रशिया... 48,500 वर्षांपासून झोपलेल्या व्हायरसला केले जागे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 11:01 AM

संसर्ग टाळण्यासाठी संशोधन सुरू

मॉस्को : रशियन शास्त्रज्ञांनी सायबेरियाच्या पर्माफ्रॉस्ट बर्फात ४८,५०० वर्षांपासून झोपलेल्या अनेक विषाणूंना पुन्हा जिवंत केले आहे. हे रशियाच्या सुदूर पूर्वेकडील सायबेरियातील पर्माफ्रॉस्टच्या ५ वेगवेगळ्या प्रजातींशी संबंधित आहेत. मेगाव्हायरस मॅमथ नावाचे हे विषाणू त्या काळापासूनचे आहेत जेव्हा सायबेरियात हत्तींचे पूर्वज मॅमथ फिरत होते. हिमयुगातील अनेक विषाणू पर्माफ्रॉस्ट बर्फात दबलेले आहेत.

हवामान बदलामुळे बर्फ वेगाने वितळत असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे दबलेले विषाणू बाहेर येऊ शकतात. जर व्हायरसचा संसर्ग अचानक पसरला तर धोका अधिक असेल. म्हणूनच शास्त्रज्ञांना विषाणू शोधून त्यांचा अभ्यास करायचा आहे, जेणेकरून त्यांचा संसर्ग टाळण्याचा मार्ग शोधता येईल. असे विषाणू पाणी असलेल्या वातावरणात टिकून राहतात. त्यांच्याकडे स्वतःला दीर्घकाळ जिवंत ठेवण्याची अद्भुत क्षमता आहे. 

३ व्हायरस २७ हजार वर्षे जुनेशास्त्रज्ञांनी विषाणूचे नमुने गोळा केले आहेत. यातील काही विषाणू ४८,५०० वर्षे जुने आहेत. तेव्हापासून ते बर्फात झोपले होते. यातील तीन विषाणू सर्वांत नवीन आहेत. त्यांचे वय २७ हजार वर्षे सांगण्यात आले आहे. त्यांना मेगाव्हायरस मॅमथ, पिथोव्हायरस मॅमथ आणि पॅंडोराव्हायरस मॅमथ अशी नावे देण्यात आली आहेत. हे विषाणू मॅमथच्या विष्ठेपासून मिळविले गेले. विष्ठा मॅमथच्या केसांमध्ये होती.

लांडग्याच्या पोटातून काढले दोन व्हायरस बर्फात मृतावस्थेत सापडलेल्या सायबेरियन लांडग्याच्या पोटातही दोन नवीन विषाणू सापडले आहेत. त्यांची नावे पॅकमॅनव्हायरस ल्युपस आणि पॅंडोराव्हायरस ल्युपस आहेत. गेल्यावर्षीदेखील रशियन शास्त्रज्ञांना सायबेरियन प्रदेशात सुमारे २४ हजार वर्षे जुना विषाणू सापडला होता. सायबेरियाच्या आर्क्टिकला लागून असलेल्या बर्फाळ प्रदेशात ते गोठलेल्या मातीत दबला गेला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाrussiaरशिया