एका महिलेने मुलाला जन्म दिला. तो जन्मापासून खूप वेगळा दिसत होता. त्याचा चेहरा ना त्याच्या आईसारखा होता ना वडिलांसारखा. मुलाच्या डोळ्यांचा रंगही वेगळा होता. त्याच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी घडू लागल्या. मात्र, आता महिलेने सांगितले आहे की, तिचे मूल एका दुर्मिळ आजाराचा बळी आहे.
द सनच्या वृत्तानुसार, सदर महिलेचे नाव हॅना डोयले आहे. ती यॉर्कशायर, यूके येथील रहिवासी आहे. तीन महिन्यांपूर्वी तिने मुलाला जन्म दिला. मुलाचे नाव झेंडर ठेवण्यात आले. झेंडरचा जन्म अत्यंत दुर्मिळ अशा स्थितीसह झाला होता.
डोयले म्हणाली की, माझा मुलगा माझ्यासारखा किंवा माझ्या पतीसारखा दिसत नव्हता. त्याचे डोळेही वेगळ्या रंगाचे होते. डोळे विस्फारलेले होते आणि डोक्याच्या मागच्या बाजूला एक गाठ होती. डॉक्टर आणि परिचारिकांना सांगितल्यानंतर ते म्हणाले की, काळजी करण्यासारखे काही नाही आणि झेंडर पूर्णपणे बरा आहे. मात्र तरीही डोयलेने डॉक्टरांवर दबाव आणत मुलाच्या अतिरिक्त चाचण्या करण्यास सांगितले.
चाचणीनंतर मुलाच्या शरीरात दुर्मिळ गुणसूत्र (Rare Chromosome) आढळून आले. चाचणीत मुलामध्ये क्रोमोसोम डिलीशन सिंड्रोम (Chromosome Deletion Syndrome) नावाचा दुर्मिळ आजार आढळून आला. हा सिंड्रोम मुलाच्या वाढीवर आणि प्रगतीवर परिणाम करतो. झेंडर हा एकुलता एक मुलगा असल्याची नोंद आहे ज्यामध्ये तो सापडला आहे. तसेच झेंडरला जन्मापासूनच हृदयविकाराचा त्रास होता. त्याच्या हृदयात छिद्र आहे. तो दुरुस्त करण्यासाठी त्याच्यावर अजून शस्त्रक्रिया देखील करणार असल्याची माहिती डोयलेने दिली. सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"