अमेरिकामधील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिला तुरुंग अधिकारी एका कैद्याच्या प्रेमात पडली. यानंतर महिलाने कायदा मोडून अनेक गोष्टी केल्या. महिला जेलरने कैद्याला किस केले, त्याच्याशी जवळीक साधली. तसेच कारागृहात असताना कैद्याने महिला जेलरचा मोबाईलही वापरला होता. सदर प्रकरण प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर संबंधित महिला अधिकारी हिला अटक केली असून तिला कामावरुन निलंबित करण्यात आले आहे.
अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना येथे डिटेंशन ऑफिसर ब्रिटनी रोक्सेन वॉकर तुरुंग अधिकारी म्हणून कार्यरत होती. तिच्यावर नार्कोटिक्स शेड्यूल, कैद्याला बेकायदेशीरपणे मदत करणे, कैद्यासोबत लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप लगावण्यात आला आहे. चेरोकी काउंटी शेरीफ कार्यालयाने सांगितले की, माजी जेलर वॉकरने कैदी ब्रायंट कीथ स्मिथला जेलमध्ये वापरण्यासाठी मोबाईल फोन दिला. वॉकरने कैद्याचे किस केले आणि त्याला लैंगिक रितीने स्पर्श केला, असा दावाही डब्ल्यूएसपीए अहवालात करण्यात आला आहे.
आफताब पुरता अडकला; श्रद्धाच्या जंगलात सापडलेल्या हाडांनी भक्कम पुरावा दिला...!
शेरीफ स्टीव्ह म्युलर म्हणाले की, कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी देखील कायद्याच्या वर असू शकत नाहीत. कोणी कायदा मोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडले जाणार नाही. म्युलर पुढे म्हणाले की, आम्ही आमच्या कर्मचार्यांना सतत आठवण करून देतो की आपण कायद्याचे पालन केले पाहिजे. वॉकर महिला तुरुंग अधिकारी या ऑगस्टपासून तिच्या पदावर होत्या.
महिला तुरुंग अधिकारी वॉकर हिला ७ डिसेंबर रोजी अटक केल्यानंतर त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. मात्र, बाँड भरल्यानंतर त्याची तुरुंगातून सुटका झाली. दरम्यान असेच एक प्रकरण ऑगस्टमध्येही समोर आले होते. तुरुंग अधिकारी रुथ शॅमलोवर एका कैद्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप होता. न्यायालयाच्या सुनावणीत कैद्याच्या नावाचा उल्लेख करण्यात आला नव्हता, मात्र शामलोचे पाच महिन्यांपासून कैद्यासोबत संबंध असल्याचा आरोप होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"