शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

Aamir Liaquat Hussain Video: पाकिस्तानी खासदाराचा बेडरुम व्हिडिओ लीक, देश सोडण्याची केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 10:29 AM

Aamir Liaquat Hussain Video: पाकिस्तानी खासदार आमिर लियाकतने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत पाकिस्तानी नागरिकांची माफी मागितली. तसेच, यात त्याने देश सोडत असल्याची घोषणाही केली.

Aamir Liaquat to leave Pakistan: बेडरुम व्हिडिओ लीक झाल्यानंतर पाकिस्तानी खासदार अमीर लियाकत हुसैनने (Aamir Liaquat Hussain) देश सोडण्याची घोषणा केली आहे. आमिर लियाकतचा हा व्हिडिओ त्याच्या बेडरूममधला असून, त्यामध्ये तो बर्फाचे ड्रग्स(Ice Drugs) घेताना दिसत होता. हा व्हिडिओ लीक झाल्यानंतर त्याने पाकिस्तानला अलविदा करण्याची घोषणा केली आहे. लियाकतने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात रडताना दिसत आहे आणि पाकिस्तानी नागरिकांची माफीदेखील मागत आहे.

आमिर लियाकतने मागितली माफीआमिर लियाकत हुसैनने इंस्टाग्रामवर 52 मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो म्हणाला, 'इस्लामचा अभ्यासक व्यसनी कसा असू शकतो.' व्हिडिओ पोस्ट करत आमिर लियाकतने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझ्यामुळे ज्यांची मनं दुखावली गेली आहेत त्या सर्वांची मी माफी मागतो. जाण्यापूर्वी मी त्यांची माफी मागतो, ज्यांनी माझ्यावर कृपा केली. मी आभारी आहे आणि ते ऋण मी मरण्यापूर्वी परत करेन.'

पाकिस्तान जगण्यालायक नाहीआमिर लियाकत व्हिडिओमध्ये पुढे म्हणाला, मी पाकिस्तानातून निघून जात आहे आणि इथे राहणार नाही, कारण हा देश आता राहण्यालायक नाही. येथील वातावरण बिघडले असून माझे मन खूप दुःखी आहे. माझ्याकडे बोटे दाखवून आक्षेपार्ह व्हिडिओसाठी मीम्स बनवण्यात आले. यामुळे मी दुखावलो गेलो, पण तरीही मी हसत राहिलो आणि ते टाळत राहिलो. यूट्यूबवर फिरत असलेला आक्षेपार्ह व्हिडिओ काढण्याची तसदी कोणी घेतली नाही.

तिसऱ्या पत्नीबद्दल काय म्हणाला?व्हिडीओमध्ये आमिर लियाकतने त्याच्या तिसऱ्या पत्नीबद्दलही भाष्य केले. डानियाने चांगले केले नाही, पण मी तिला माफ केले आहे. जर तिने अल्लाहकडे माफी मागितली तर माझ्या घराचे दरवाजे तिच्यासाठी सदैव उघडे आहेत.

पत्नीकडून ड्रग्ज घेतल्याचा आरोप आमिर लियाकतची तिसरी पत्नी दानिया मलिकने त्याच्यावर ड्रग्ज घेतल्याचा आरोप केला आहे. दानियाने बर्फाचे ड्रग्ज घेत असल्याचा दावा करत व्हिडिओ लीक केला होता. दानियाने आमिर लियाकतपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून तिचे नाव दानिया आमिरवरून बदलून दानिया मलिक केले आहे. विशेष म्हणजे, आमिर लियाकत हुसैन 49 वर्षांचा आहे आणि त्याची तिसरी पत्नी दानिया मलिक फक्त 18 वर्षांची आहे. त्यांच्या वयात 31 वर्षांचा फरक असूनही आमिर लियाकतने दानियाशी लग्न केले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान