पाकिस्तानचे (Pakistan MP) खासदार आमिर लियाकतने (Aamir Liaquat Hussain) १८ वर्षाच्या सईदा दानियासोबत (Syeda Dania shah) लग्न केल्यापासून तो फारच चर्चेत आहे. आमिर लियाकतने नुकतंच ३१ वर्षाने लहान तरूणीसोबत लग्न केलं. हे त्याचं तिसरं लग्न होतं. यानंतर सोशल मीडियावर त्यांचा फोटो व्हायरल झाला आणि त्यांची चर्चा रंगली. आता त्यांनी एका यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. आता या मुलाखतीची चर्चा होत आहे.
या मुलाखतीदरम्यान सईदाने सांगितलं की, जेव्हा मी बालपणी रडत होते तेव्हा आई-बाबा मला टीव्हीवर आमिर लियाकतला दाखवून गप्प करत होते. सईदाने पहिल्या भेटाबाबतही सांगितलं. ती म्हणाली की, 'माझा तर विश्वासच बसत नव्हता की, ते माझ्यासमोर आहेत. मी त्यांना बघून कन्फ्यूज झाले होते. मी म्हणाले की, हे फेक आहे. तुम्ही बालपणापासून ज्याच्यावर इतकं प्रेम करता तो एकदम असा समोर आला तर कसं वाटेल?
सईदा दानियाने पुढे सांगितलं की, 'होय, मी यांना चौथं लग्न करण्याचीही परवानगी दिली आहे. त्यांना करायचं असेल तर करू शकतात. तो माझा अधिकार नाही की, मी त्यांना रोखू. त्यांची मर्जी करावं की नाही. जर मी त्यांना प्रेम दिलं तर ते माझ्याकडेच राहतील. जर मी नाही दिलं तर ते लग्न करतील'.
यावेळी सईदाला विचारण्यात आलं की, तुमची पहिली भेट कशी झाली? यावर सईदाने उत्तर दिलं की, 'आमची पहिली भेट केवळ २८ मिनिटांची होती. कोणतंही २८ दिवसांचं अफेअर नव्हतं आणि याआधी आम्ही कधी बोललो पण नाही.
आमिर म्हणाला की, मी एका कार्यक्रमला गेलो होतो. त्यानंतर मी एका पीर बाबाच्या घरी गेलो. ते मला म्हणाले की, आम्ही तुमचं एका तरूणीसोबत लग्न लावून देतो. बस तुम्हाला त्यांना बघायचं नाहीये. मी त्यांना पाहिलंच नाही. नंतर मी जेव्हा त्या तरूणीला भेटलो तर ती सईदा दानिया होती. तेव्हा मला तिचा बालपणीचा किस्सा समजला.