लाहोर : अफगाणिस्तानचे राजे अहमद शाह दुर्रानी अर्थात अहमद शाह अब्दाली यांचा वंशज असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने लाहोजवळील १८२ एकर जमिनीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बारकी येथील ही जमिन इंग्रजांनी आपल्या कुटंूबाला दिली होती. पाकिस्तानच्या निर्मीतीनंतर केंद्र सरकारने या भाडेपट्ट्याचा आदर करीत त्यात ढवळाढवळ न करण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, पंजाब सरकारने हा भाडेपट्टा रद्द करीत ही जमिन माहिती तंत्रज्ञान विद्यापीठ उभारण्यासाठी अलीकडेच ताब्यात घेतल्याचे शाहपूर दुर्रानी यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे. आपल्या पुर्वजांनी मुस्लिमांसाठी केलेल्या कामाचे बक्षीस म्हणून ब्रिटीश शासकांनी ही जमिन त्यांना दिली होती. पंजाब सरकारने हा भाडेपट्टा रद्द केला. सरकारची ही कृति चूकीची असून भाडेपट्टा पुन्हा बहाल करण्यात यावा, अशी मागणी दुर्रानी यांनी केली आहे. (वृत्तसंस्था)
अब्दालीचे वंशज जमिनीसाठी कोर्टात
By admin | Published: September 01, 2016 4:23 AM