येरुशलेम: आंतरराष्ट्रीय स्तरावरून तंत्रज्ञान चोरून पाकिस्तानला अणुबॉम्ब बनवून देणारे अब्दुल कादीर खान (Abdul Qadeer Khan) यांचा रविवारी मृत्यू झाला. यावर इस्त्रायली पत्रकार योस्सी मेलमॅन यांनी मोठा खुलासा केला आहे. इस्त्रायलच्या मोसादला जर खान यांच्या हेतूबाबत माहिती मिळाली असती तर मोसादने त्यांना तेव्हाच ठार केले असते, असा दावा मेलमॅन यांनी केला आहे.
इस्त्रायलची मोसाद (Israeli Mossad) ही गुप्तहेर संघटना जगातील सर्वाधिक शक्तीशाली संघटनांमध्ये गणली जाते. मात्र, मोसाद खान यांचे हेतू ओळखण्यास चुकली असे ते म्हणाले. मोसादचे माजी प्रमुख शबतई शावित यांनी सुमारे 15 वर्षांपूर्वी ही बाब सांगितल्याचे मेलमैन म्हणाले.
हारेज वृत्तपत्रात त्यांचा एक लेख छापून आला आहे. अब्दुल कादिर खान यांनी पाकिस्तानला अणुबॉम्ब दिला. त्यांनी अणुबॉम्बची गोपनिय माहिती चोरली आणि विकली. या पाकिस्तानी अणू उर्जा शास्त्रज्ञाने पाकिस्तान, ईराण सारख्या देशांना अण्वस्त्रांनी सुसज्ज होण्यास मदत केली. लीबियाचा हुकुमशहा गद्दाफीलादेखील रिअॅक्टरबाबत माहिती पुरविली. मोसादनच त्याला मारले, असे मेलमॅन म्हणाले.
पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक म्हटले जाणाऱ्या अब्दुल कादिर खान यांचा रविवारी मृत्यू झाला. ते 85 वर्षांचे होते. हाऊ पाकिस्तान्स ए क्यू खान, फादर ऑफ द मुस्लिम बम, एस्केप्ड मोसाद असेसिनेशन या शीर्षकाच्या लेखात म्हटले आहे की मोसादने पश्चिम आशियामध्ये खान यांच्या अनेक प्रवासांची माहिती मिळविली. मात्र, त्यांच्या अण्वस्त्र प्रचाराच्या मनसुब्यांना ओळखू शकली नाही.
मोसाद प्रमुख शावित यांनी दीड दशकापूर्वी मला याची माहिती दिली होती. मोसाद आणि अमान यांनी खान यांचे मनसुबे ओळखले नाहीत. जर खान यांच्याबाबत ही माहिती मिळाली असती तर आपण त्यांना मारण्यासाठी मोसादची टीम पाठविली असती. यामुळे इस्त्रायल आणि ईराण वैराचा इतिहासच बदलला असता.