शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

अबब ! 1285 कोटी रुपये, गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार

By admin | Published: April 29, 2017 2:33 PM

गतवर्षी म्हणजेच 2016 मध्ये सुंदर पिचाई यांना पगार म्हणून तब्बल 1 हजार 285 कोटी रुपये मिळाले आहेत

ऑनलाइन लोकमत
ह्यूस्टन, दि. 29 - गूगलचे भारतीय वंशाचे सीईओ सुंदर पिचाई यांनी यशाचे शिखर गाठत असताना पगाराच्या बाबतीतही नवं शिखर गाठलं आहे. गतवर्षी म्हणजेच 2016 मध्ये सुंदर पिचाई यांना पगार म्हणून तब्बल 1 हजार 285 कोटी रुपये मिळाले आहेत. म्हणजेच याचा अर्थ सुंदर पिचाई महिन्याला जवळपास 100 कोटींची कमाई करत आहेत. सुंदर पिचाई यांना मिळालेली ही रक्कम 2015 मध्ये मिळालेल्या रक्कमेच्या दुप्पट आहे. 2016 मध्ये त्यांना तब्ब्ल 6.50 लाख डॉलर्स म्हणजेच जवळजवळ चार कोटी 17 लाखांची रक्कम देण्यात आली होती. 2015 मध्ये मिळालेल्या पगारापेक्षा हा कमी होता. 2015 मध्ये पिचाई यांना 6.52 लाख डॉलर्स (4.19 कोटी) मिळाले होते. 
 
दिर्घकाळापासून कंपनीचे कर्मचारी म्हणून काम करणा-या सुंदर पिचाई यांची गूगलने 2015 मध्ये सीईओपदी नियुक्ती केली होती. 2016 मध्ये कंपनीला 198.7 मिलिअन डॉलर्स (जवळपास 12.77 अरब) किंमतीचे शेअर्स मिळाले आहेत जे 2015 च्या तुलनेत दुप्पट आहेत. 
 
सीईओपदी झालेली बढती आणि अनेक नव्या प्रोडक्ट्सचं यशस्वीरित्या लाँचिंग केल्याचं पारितोषिक म्हणून त्यांना एवढी मोठी रक्कम देण्यात आली आहे. पिचाई यांच्या नेतृत्वात गूगलने आपल्या प्रमुख जाहिराती तसंच युट्यूब बिजनेसमध्ये चांगली प्रगती झाली आहे. यादरम्यान कंपनीने मशिन लर्निंग, हार्डवेअर आणि  क्लाउड कम्प्युटिंग क्षेत्रातही गुंतवणूक केली आहे.