सॅन फ्रान्सिस्को : गुगलने वॉल स्ट्रीटच्या सगळ्यात शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या महिला रूथ पोराट यांना आपल्या मुख्य आर्थिक अधिकारीपदी नियुक्त केले असून त्यांना सात कोटी डॉलरपेक्षाही जास्त वेतन दिले आहे. रूथ पोराट या मॉर्गन स्टॅन्ले कंपनीत होत्या. तेथील वेतनापेक्षा गुगलने त्यांना सात पट जास्त वेतन दिले आहे. एवढे वेतन वाढवून दिल्यामुळे गुगल पोराट यांना किती महत्त्व देते हे स्पष्ट होते. पोराट या मॉर्गन स्टॅन्ले कंपनीत २०१० पासून मुख्य आर्थिक अधिकारी होत्या. गुगलमध्ये रूथ २६ मेपासून रुजू होतील. त्या रुजू होताच गुगल त्यांना अडीच कोटी डॉलरचे शेअर देईल व पुढील वर्षी चार कोटी डॉलरचे. गुगल इंक त्यांना ५० लाख डॉलर करारावर स्वाक्षरी करण्यासाठी बोनस म्हणून देणार आहे व तो सुरुवातीच्या सहा लाख ५० हजार डॉलरमध्ये समाविष्ट आहे.
अबब, ७ कोटी डॉलर वेतन
By admin | Published: March 27, 2015 11:41 PM