ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. ३ - तिरूअनंतपुरम येथून दुबईला निघालेल्या एमिरेट्स एअरलाइन्सच्या विमानाला दुबई विमानतळावर अपघात झाला. मात्र या अपघातात सुदैवाने विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या विमानात २७५ प्रवासी आणि क्रू-मेंबर होते.
एमिरेट्स एअरलाइन्सचे EK521 हे विमान तिरुअनंतपुरम येथून दुबईला निघाले होते. मात्र दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड करत असतानाच अपघात झाला आणि या विमानात आग लागली. येथील स्थानिक वेळेनुसार दुपारी १२.४५ च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात विमानाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने दाखल होत आग विझवल्याने मोठी जीवितहानी टळली. या दुर्घटनेनंतर विमाने मॅकटौम वा शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळावर वळवण्यात आली आहेत.
#Emirates plane on fire at #Dubai Airport, all passengers safe (Picture Source: Al Arabiya) pic.twitter.com/S8suUA85aQ— ANI (@ANI_news) August 3, 2016
#Emirates plane on fire at Dubai Airport; no injuries reported, says Dubai Media Office (Picture Source: Al Arabiya) pic.twitter.com/JlRgh6ywLU— ANI (@ANI_news) August 3, 2016
All #Dubai flights diverted to Maktoum International Airport or Sharjah International Airport: Al Arabiya— ANI (@ANI_news) August 3, 2016
WATCH: Visuals of #Emirates Dubai to Trivandrum aircraft which caught fire at Dubai airport, all passengers safehttps://t.co/6iYsz00aiE— ANI (@ANI_news) August 3, 2016