वॉशिंग्टन : बेकायदा स्थलांतरितांविरोधात कठोर कारवाई करणार या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणानुसार किमान सहा शहरांमध्ये छापे टाकण्यात आल्यामुळे घबराट व दहशत निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी ज्यांच्याकडे अमेरिकेत राहण्यासाठी कायदेशीर दस्तावेज नसल्याल्या शेकडोंना अटक केली. अमेरिकेत ११ दशलक्ष लोक बेकायदेशीरपणे राहत आहेत. अशा लोकांवर कारवाई केली जाईल, असे ट्रम्प यांनी जाहीर केल्यावर झालेली ही पहिलीच मोठी कृती आहे.बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांना शोधून काढण्यासाठी न्यूयॉर्क, लॉस एंजिलिस, नॉर्थ व साऊथ कॅरोलिना, अटलांटा आणि शिकागो शहरांत हे छापे घालण्यात आले. लॉस एंजिलिसमध्ये ज्या लोकांना स्थानबद्ध करण्यात आले आहे त्यातील प्रत्येक तिसऱ्या व्यक्तिला मेक्सिकोला परत पाठवले जाईल, या वृत्ताला स्थलांतर अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.
बेकायदा राहाणाऱ्यांवर अमेरिकेत कारवाई!
By admin | Published: February 13, 2017 12:28 AM