मेलबर्न : अदानी ग्रुप व स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे संबंध संपुष्टात आले आहेत. कॉमनवेल्थ बँकेनंतर ‘अदानी गु्रप’च्या आॅस्ट्रेलियातील कोळसा खाण प्रकल्पातून बाहेर पडलेली स्टँडर्ड चार्टर्ड बँक ही दुसरी मोठी बँक आहे.अदानींच्या कोळसा प्रकल्पाची पर्यावरण मंजुरी न्यायालयाने रद्द केल्यानंतर आठवडाभरात दोन बँकांनी साथ सोडल्यामुळे कंपनीच्या क्विन्सलँड येथील कारमायकेल कोळसा खाण प्रकल्पाच्या भवितव्यावरील प्रश्नचिन्ह आणखी गडद झाले आहे. हा प्रकल्प १६.५ अब्ज डॉलरचा आहे. कॉमनवेल्थ बँक अदानींच्या प्रकल्पाची आर्थिक सल्लागार म्हणून काम बघत होती. मात्र, गेल्या आठवड्यात या बँकेने आपण हे काम करणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर स्टँडर्ड चार्टर्ड बँकेनेही अदानींच्या या वादग्रस्त प्रकल्पातून अंग काढून घेतले आहे. आॅस्ट्रेलियातील मंजुरी प्रक्रियेला होत असलेल्या विलंबाबाबत कंपनी स्वत:च चिंतित आहे. या पार्श्वभूमीवर स्टँडर्ड चार्टर्डने आर्थिक सल्लागार म्हणून अंग काढून घेतले.भूमिका रद्द करण्याची विनंती केली होती, असे अदानींच्या प्रवक्त्याने सांगितले. दरम्यान, आर्थिक सल्लागाराची भूमिका सोडण्याचा निर्णय परस्पर संमतीने झाला होता, असे स्टँडर्ड चार्टर्डने म्हटले आहे.
अदानीशी स्टँडर्ड चार्टर्डचे संबंध संपले
By admin | Published: August 12, 2015 2:01 AM