वॉशिंग्टन : आॅनलाइन व्यवसाय करणारी आघाडीची कंपनी अॅमेझॉन डॉट कॉम आगामी १८ महिन्यांत अमेरिकेत १ लाख नवे कर्मचारी भरणार आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष यांनी अमेरिकी नागरिकांना नोकऱ्यांत प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारलेले आहे. या पार्श्वभूमीवर अॅमेझॉनचा हा निर्णय आला आहे.अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांनी निवडणूक प्रचाराच्या काळात ट्रम्प यांच्या धोरणांना विरोध केला होता. त्यामुळे कंपनीचा हा निर्णय सर्वांनाच चकित करणारा आहे. ट्रम्प यांना खुष करण्यासाठी कंपनीने हा निर्णय जाहीर केल्याचे बोलले जात आहे.
अॅमेझॉन अमेरिकेत करणार १ लाख कर्मचाऱ्यांची भरती
By admin | Published: January 24, 2017 12:40 AM