लोकमत न्यूज नेटवर्कइंग्लंड : सौदी अरेबिया येथील प्रसिद्ध शस्त्रविक्रेते अदनान खशोगी यांचे लंडनमध्ये बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.खशोगी यांचे जगभरातील व्यावसायिक व राजकीय व्यक्तींशी चांगले संबंध होते. १९८० मध्ये बोफोर्स तोफ घोटाळा उघड झाल्यावर ते पहिल्यांदा प्रकाशझोतात आले. त्यावेळी ओट्टाविओ क्वात्रोची व चंद्रास्वामी यांच्यामध्ये झालेला ६०० कोटी रुपयांचा बोफोर्स तोफ खरेदी करार खशोगी यांनी उघड केल्याचा आरोप होता. क्वात्रोची यांना अटक होऊन जामीन मिळाला होता. परंतु खशोगी स्वत:ला अटक होण्यापासून वाचविण्यास व भारताबाहेर राहण्यास यशस्वी ठरले होते. खशोगी त्यांच्या उच्च जीवनशैली, लक्झरी नौका नबिला व डीसी ९ या आलिशान विमानाकरिताही ओळखले जात होते. एकवेळी त्यांच्याकडे तीन बिलियन डॉलर्सची संपत्ती होती. प्रिन्सेस डायनासोबत प्रेमसंबंध असणाऱ्या दोडी अल फय्याद यांचे ते काका होते.
अदनान खशोगी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2017 5:29 AM