काबुल – अफगाणिस्तानवर(Afghanistan) तालिबाननं(Taliban) कब्जा केल्यानंतर त्याठिकाणची सगळीच परिस्थिती बदलली आहे. मुख्य म्हणजे कुठलीही लढाई न करता अफगाणिस्तानच्या सैन्याने तालिबानींसमोर शरणागती पत्करली. त्यामुळे सहजपणे तालिबानला काबुलवर कब्जा मिळवता आला. अफगाणिस्तानच्या सैन्यातील लेफ्टनंट जनरल सामी सादात यांनी माघार का घेतली याबाबत अमेरिकन वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. त्यात खुलासा केला आहे.
सामी सादातनं म्हटलं आहे की, अमेरिकन सहकाऱ्यांनी सर्वकाही सोडून देण्याच्या भावनेमुळे अफगाणिस्तानच्या सैन्याची इच्छाशक्ती हरपली. १५ ऑगस्टला काबुलवर तालिबानने कब्जा केल्यानंतर पहिल्यांदाच हा खुलासा झाला आहे. अफगाणिस्तानी सैन्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. आमचं सैन्य क्रोनिज्म आणि ब्यूरोक्रेसीशी लढत आहे. जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी अमेरिकन सैन्य लढाई करणार नाहीत. तेव्हा अफगाणिस्तानच्या सैन्य हताश झालं असं त्यांनी सांगितले.
मी अफगाणिस्तानी सैन्यात थ्री स्टार जनरल आहे. ११ महिन्यासाठी २१५ Maiwand Corps चा कमांडर म्हणून मी दक्षिणी-पश्चिमी अफगाणिस्तानात तालिबानविरोधात मोहिमेत १५०० जवानांचे नेतृत्व केले आहे. मी शेकडो अधिकारी आणि सैन्यांना मरताना पाहिलं आहे त्यामुळे मी निराश आहे. एका वैवाहारिक दृष्टीकोनातून मी अफगाणिस्तानच्या सैन्याचं रक्षण करु इच्छित होतो. मी अफगाणी सैन्याच्या चुका लपवू शकत नाही परंतु आमच्यातले अनेकजण धाडसानं आणि सन्मानान लढाई लढत होते हे सत्य आहे. आम्ही केवळ अमेरिका आणि अफगाणी नेतृत्वामुळे हरलो आहोत असं अफगाणी कमांडरनं सांगितले आहे.
सामी अफगाणी सैन्याच्या पराभवामागे तीन प्रमुख कारणं सांगतात. त्यातलं पहिलं अमेरिकेचं दोहा शांतता करार, दुसरं अफगाणी सैन्याकडे लढण्यासाठी अपुरा शस्त्रसाठा आणि तिसरं अशरफ घनी सरकारचा भ्रष्टाचार. अफगाणी सैन्यासाठी अमेरिकन हवाई आधारचे नियम रातोरात बदलण्यात आले ज्यामुळे तालिबानचा उत्साह वाढला. ते विजय मिळवू शकत होते परंतु त्यांना फक्त अमेरिकेन सैन्याच्या वापसीची प्रतिक्षा होती असं लेफ्टनंट जनरल यांनी सांगितले.
दरम्यान, अफगाणिस्तानच्या दोन बड्या शहरांमध्ये कंधार आणि हेरात इथं तालिबाननं कब्जा मिळवल्यानंतर जनतेत आक्रोश आणि निराशा प्रचंड वाढली होती. हेरात आणि कंधार रहिवासांचा आरोप आहे की, अफगाणिस्तानच्या दोन सर्वात मोठ्या शहरांवर तालिबाननं अवघ्या काही दिवसांत सरकारी दलांना गुडघे टेकायला भाग पाडलं यावर आमचा विश्वास बसत नाही. कुठलाही सरकारी विरोध नाही, आम्हाला सरकारनं विकलं असावं असं कंधारमध्ये राहणारी महिला अल जजीरा यांनी सांगितले.