अफगाणिस्तानवरतालिबानचा वाढता प्रभाव पाहून अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडला होता. तसंच जाताना त्यांनी आपल्यासोबत चार गाड्याभरून पैसे आणि चॉपर नेल्याचा दावा रशियन दुतावासानं प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्यानं केला होता. दरम्यान, सध्या अशरफ गनी हे कोणत्या देशात आहेत याची माहिती समोर आलेली नाही. परंत आता ताजिकिस्तानमधील अफगाणिस्तानच्या दुतावासानं इंटरपोलला अशरफ गनी यांना ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. दुतावासानं इंटरपोलकडे अशरफ गनी आणि हमदुल्लाह मोहिम, तसंच फजल अहमद फाजली यांना सार्वजनिक संपत्ती चोरण्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. तसंच ती संपत्ती अफगाणिस्तानला परत करण्यात यावी असंही म्हटलंय. टोलो न्यूजनं सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं अशरफ गनी यांनी पैशांनी भरलेल्या कार आणि चॉपर घेऊन पलायन केल्याचा दावा केला होता. तसंच रशियाची वृत्तसंस्था RIA आणि काही प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्यानं हे वृत्त देण्यात आलं होतं. अशरफ गनी यांना काही पैसे या ठिकाणीच सोडून जावे लागले कारण ते त्यात ठेवू शकत नव्हते, असंही यावेळी सांगण्यात आलं.
गनींचा फोटोही काढलाअफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडून पलायन केलं. त्यानंतर, उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी स्वत:ला अफगाणिस्तानचं काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष घोषित केलं. सालेह यांनी केलेल्या घोषणेचा परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. ताजिकिस्तानमधील अफगाणिस्तानच्या दुतावासातून अशरफ गनी यांना फोटो काढून टाकण्यात आला आहे. त्याऐवजी आता अमरुल्ला सालेह यांचा फोटो लावण्यात आला आहे. तसेच, पंचशीरचा वाघ म्हटलं जाणाऱ्या अहमद शाह मसूद यांचाही फोटो दुतावासात लावण्यात आला आहे.